Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शहरांसह खेड्यापाड्यातल्याही महिलांचं बीपी हाय! तज्ज्ञ सांगतात, घरोघर महिला आजार

शहरांसह खेड्यापाड्यातल्याही महिलांचं बीपी हाय! तज्ज्ञ सांगतात, घरोघर महिला आजार

High blood pressure in urban population: World Hypertension Day 2025: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण १४ टक्के आणि मधुमेहाचे प्रमाण ६ टक्के आढळून आले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2025 09:05 IST2025-06-07T09:00:00+5:302025-06-07T09:05:02+5:30

High blood pressure in urban population: World Hypertension Day 2025: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण १४ टक्के आणि मधुमेहाचे प्रमाण ६ टक्के आढळून आले आहे.

World Hypertension Day 2025 urban rural people increasing high blood pressue issue lifestyle risk how to control bp | शहरांसह खेड्यापाड्यातल्याही महिलांचं बीपी हाय! तज्ज्ञ सांगतात, घरोघर महिला आजार

शहरांसह खेड्यापाड्यातल्याही महिलांचं बीपी हाय! तज्ज्ञ सांगतात, घरोघर महिला आजार

बदलेल्या जीवनशैलीचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. कमी वयातच अनेक गंभीर आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते.(World Hypertension Day 2025) त्यातील एक उच्च रक्तदाब. बीपी किंवा ब्लडप्रेशरचा त्रास अनेक तरुणांमध्ये दिसण्याचे प्रमाण वाढले आहे.(High blood pressure awareness 2025) बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला विविध औषधे घ्यावी लागतात. (Blood pressure control tips 2025)
अशातच एका सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्रातील ग्रामीण भागात महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण १४ टक्के आणि मधुमेहाचे प्रमाण ६ टक्के आढळून आले आहे. (High blood pressure in urban population) ज्यामुळे जीवनशैलीसंबंधितचे आजार हे फक्त शहरी भागांपुरते मर्यादित राहिलेले नाही.(Rural India hypertension cases rising) उच्चरक्तदाब, मधुमेहसारख्या आजारांवर धोरणे आणण्यासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलत नाही असं तज्ज्ञांचे मत आहे. (BP issues in young adults)

स्वयंपाकघरातील 'या' मसाल्याची पावडर अनेक आजारांवर बहुगुणी, हाडं होतील दणकट- झोपही शांत लागेल

२०२२ साली राज्यात आई सुरक्षित तर घर सुरक्षित अशी मोहिम सुरु करण्यात आली होती. ज्या महिलांमध्ये बीपी आणि मधुमेहाची लक्षणे दिसली. त्यांची चाचणी करण्यात आली. बीपीची तपासणी केल्यानंतर १४ टक्के महिला या आजाराने ग्रस्त दाखवल्या तर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ६ टक्के महिला आढळून आल्या. अनेक जिल्ह्यांमध्ये या आजाराबाबत मोठी तफावत पाहायला मिळाली. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, जीवनशैलीच्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजनांचा अभाव कमी आहे. जंक फूड, जास्त मीठाचे पदार्थ आणि खराब जीवनशैलीबद्दल जनजागृकरता करायला हवी. 

अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

ग्रामीण भागात देखील हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. एनसीडीच्या सहसंचालक डॉ.पद्मजा जोगेवार म्हणतात की, महाराष्ट्राची संख्या धक्कादायक नाही परंतु, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्ही आजारामुळे ग्रामीण भागातील महिलांना त्रास होतो. खराब खाण्याच्या सवयी, बैठी जीवनशैली आणि ताण हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. 

महिलांमध्ये ब्लडप्रेशरचे प्रमाण हे वयाच्या २१ ते २५ मध्ये एसबीपी ११५. ५ मिमी असावा, तर २६ ते ५० वयात बीपी १२४ पर्यंत जाते. याशिवाय ५१ तो ६१ वयोगटातील महिलांचा बीपी हा १३० पर्यंत असावा, असं डॉक्टरांनी सांगितले. 

Web Title: World Hypertension Day 2025 urban rural people increasing high blood pressue issue lifestyle risk how to control bp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य