Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कोलेस्टेरॉल लेव्हल कमी तरी अनेकांना येतो आहे Heart Attack, डॉक्टर सांगतात धक्कादायक कारणं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 16:30 IST

Heart Attack Real Causes : कोलेस्टेरॉल कमी असल्यावरही अनेकांना हार्ट अ‍ॅटॅक का येतो? संशोधनातून समोर आली याची मुख्य कारणे...

Heart Attack Real Causes : हार्ट अ‍ॅटॅकच्या केसेस अलिकडे खूप वाढल्या आहेत. तरूणांचा सुद्धा हार्ट अ‍ॅटॅकमुळे जीव जाणं चिंतेचा विषय ठरत आहे. बऱ्याच लोकांना हेच वाटतं की, कोलेस्टेरॉल वाढलं म्हणजेच हार्ट अ‍ॅटॅक येतो किंवा कोलेस्टेरॉल कंट्रोल केल्यास हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी होतो. त्यामुळे लोक फक्त बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यावरच अधिक फोकस करतात. पण मुळात सत्य काहीतरी वेगळंच आहे. न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांचं मत आहे की, हृदयरोगांचं सत्य काही वेगळंच आहे. ते सांगतात की, कमी झोप आणि मानसिक समस्या आपल्या हृदयाच्या आरोग्यात महत्वाची भूमिका बजावतात. 

दोन कोटी लोकांवर संशोधन

डॉ. सुधीर कुमार यांनी एका संशोधनाच्या हवाल्याने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. अलिकडेच २ कोटी २० लाखांपेक्षा जास्त लोकांवर एक फार मोठं संशोधन करण्यात आलं. ज्यातील निष्कर्ष आपले डोळे उघडणारे आहेत. यात सांगण्यात आलंय की, डिप्रेशनमुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका फार जास्त वाढतो. एंझायटीमुळेही हार्ट अ‍ॅटॅकचा अधिक वाढतो, तसेच चांगली चांगली झोप लागत नसेल किंवा कमी झोपेनेही हृदयाला थेट धोका होतो. इतकंच नाही तर ज्या लोकांवर एखादा मोठा मानसिक आघात झाला असेल म्हणजे ज्यांना PTSD आहे, त्यांच्यातही हार्ट अ‍ॅटॅकचा धोका ३ पटीने वाढलेला बघण्यात आला.

आजाराच्या मुख्य कारणाकडे दुर्लक्ष

डॉक्टर सांगतात की, संशोधनातील या स्पष्ट आणि डोळे उघडणाऱ्या आकडेवारीनंतरही आपला मेडिकल अ‍ॅप्रोच अजूनही जुनाच आहे. हार्ट अ‍ॅटॅकला जबाबदार कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आपण अनेक औषधं घेतो. पण आपण स्ट्रेस, बर्नआउट आणि झोपेची खराब क्वालिटी या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. 

हार्मोन्स असंतुलन आणि वाढता तणाव

जेव्हा आपण सतत मानसिक तणावात असतो आणि पुन्हा पुन्हा झोपमोड होते, तेव्हा शरीरात अनेक नकारात्मक बदल होतात. यामुळे शरीरात सूज येते, ब्लड प्रेशर अचानक वाढू लागतं आणि हार्मोन्सचं संतुलन पूर्णपणे बिघडतं. या सर्व गोष्टींमुळे आपल्या धमण्यांचं नुकसान होतं, ज्यामुळे अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोमचा धोका निर्माण होतो.

मेंदू फिट तर हृदय फिट

जर आपला मेंदू फिट नसेल, निरोगी किंवा शांत नसेल तर आपलं हृदय देखील सुरक्षित राहू शकत नाही. त्यामुळे मानसिक समस्यांना हलक्यात घेऊ नका. मानसिक समस्या दूर करण्यासाठी योग्य उपायांवर फोकस करा, जेणेकरून हृदय देखील निरोगी राहील. यासाठी सायकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Heart attacks occur despite normal cholesterol; stress is a key factor.

Web Summary : Heart attacks are rising, even with normal cholesterol. Stress, anxiety, poor sleep, and mental trauma significantly increase heart attack risk. Ignoring these factors, focusing solely on cholesterol, is a flawed approach. Mental well-being is crucial for heart health; seek psychological help.
टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाहेल्थ टिप्स