हिवाळ्याच्या दिवसात वातावरणात गारवा पसरतो. तापमान देखील कमी होत जाते.(winter bath tips) येत्या काही दिवसात थंडी देखील वाढेल.(hot vs cold water bath benefits) अशावेळी आपल्या आरोग्याची काळजी जास्त प्रमाणात घ्यावी लागते. हिवाळ्यात काही जण गरम पाण्याने तर काही थंड पाण्याने आंघोळ करतात. इतकंच नाही तर साबण, फेसवॉश याची देखील काळजी घेतली जाते.(winter skincare routine) वातावरणातली गारव्यामुळे त्वचा कोरडी पडते, खाज सुटते, ओठ फुटतात ज्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टींची नीट काळजी घ्यावी लागते.(how to bathe in winter for glowing skin) आंघोळीसाठी जितका साबण महत्त्वाचा असतो तितकेच पाणी आणि त्याचे तापमान. हिवाळा आला की सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो तो आंघोळ गरम पाण्याने करावी की थंड पाण्याने? (lukewarm water benefits for skin) थंडीच्या दिवसात गरम पाणी आपल्याला शरीराला ऊब देते. पण जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेचं आणि केसांचा नैसर्गिक ओलसरपणा नष्ट होतो. यामुळे त्वचा कोरडी, खरखरीत होते आणि केस गळण्याची शक्यता देखील वाढते. जाणून घेऊया थंडीच्या दिवसात कोणत्या पाण्याने आंघोळ करायला हवी.
हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
गरम पाण्याची उष्णता स्नायूंना आराम देते. इतकेच नाही तर आपला स्ट्रेस देखील कमी करते. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या सुरळीत करुन रक्तप्रवाह सुधारते. वातावरणातील बदलामुळे स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो किंवा वेदना होऊ लागते अशावेळी गरम पाणी फायदेशीर ठरते. गरम पाण्याची वाफ आपल्या नाकाचे मार्ग देखील स्वच्छ करते. हिवाळ्यात जर सर्दीचा त्रास होत असेल तर गरम पाणी फायदेशीर ठरु शकते.
लग्नसमारंभात उठून दिसतात कुंदन बांगड्या घातलेले हात, पाहा ५ लेटेस्ट- सुंदर कुंदन चुडी सेट
हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करण्याचे तोटे
सतत गरम पाण्याचा वापर केल्यास आपल्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. यामुळे हिवाळ्यात त्वचेतील कोरडेपणा वाढू लागतो. तसेच जळजळ आणि खाज देखील सुरु होते. गरम पाण्याने आंघोळ केल्यास एक्झिमा किंवा सोरायसिसारखे आजार देखील उद्भवतात.
डॉक्टर काय सांगतात?
रोज थंड पाण्याने आंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. कारण थंड पाण्यामुळे पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते. थंड पाण्याने आपल्या शरीराल ऊर्जा मिळते. हिवाळ्यात थंड पाणी खूप महत्त्वाचे असते.यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. सांधेदुखीपासून देखील आराम मिळतो. पण अनेकदा थंड पाण्याने सर्दी-खोकल्यासारखे आजार उद्भवतात. श्वसनाच्या समस्या देखील वाढतात. अशा वेळी तज्ज्ञ म्हणतात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करायला हवा. जास्त गरम किंवा खूप थंड पाणी वापरु नका. यामुळे त्वचेसह आरोग्याला नुकसान होईल.
Web Summary : In winter, lukewarm water is best for bathing. Hot water can dry skin, while cold water boosts immunity but may cause colds. Doctors advise lukewarm to protect skin and health.
Web Summary : सर्दियों में नहाने के लिए गुनगुना पानी सबसे अच्छा है। गरम पानी त्वचा को रूखा कर सकता है, जबकि ठंडा पानी प्रतिरक्षा बढ़ाता है पर सर्दी कर सकता है। डॉक्टर गुनगुना पानी इस्तेमाल करने की सलाह देते हैं।