रोज आंघोळ करणं म्हणजे आपल्या शरीराची स्वच्छता करणं. यामुळे आपले शरीर तर स्वच्छ होते पण थकवा देखील निघून जातो.(women bathing mistakes) मनाला रिफ्रेश करता येते. आंघोळ करताना आपण साबण वापरतो. मागच्या कित्येक काळापासून साबणाचा वापर शरीरासाठी केला जात आहे.(soap use risks for women) शरीरातून सुगंध यावा, घामाचा वास येऊ नये म्हणून बाजारात विविध प्रकारचे सुगंधित साबण पाहायला मिळतात.(women hygiene tips) इतकेच नाही तर साबणाऐवजी बॉडी वॉश देखील अनेक लोक वापरताना दिसत आहे. यात महिलांची संख्या अधिकच. (bathing tips for women)
आंघोळीच्या वेळी साबण किंवा बॉडी वॉश संपूर्ण शरीराला लावणं महिल्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.(intimate hygiene mistakes) विशेषतः महिलांनी आंघोळीच्या वेळी शरीराच्या काही भागांवर साबण लावणे ही एक सर्वसामान्य सवय असते, पण डॉक्टरांच्या मते ही सवय धोकादायक ठरू शकते. महिला स्वच्छतेच्या बाबतीत अतिउत्साहीपणात शरीराच्या प्रत्येक भागावर साबण वापरतात.(skincare routine for women) पण यामुळे शरीराच्या काही नाजूक भागांचे नुकसान होऊ शकते. साबण किंवा बॉडी वॉश वापरणं त्वचेसाठी हानिकारक ठरु शकतं.(health tips for women) यामुळे त्या भागातील नैसर्गिक ओलावा कमी होऊन, त्वचा कोरडी पडते आणि इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.(doctor advice on bathing habits) शरीराच्या कोणत्या भागाला महिलांनी साबण, बॉडी वॉश लावू नये पाहूया. 
डॉक्टर सांगतात महिलांनी प्रायव्हेट पार्टमध्ये साबण, बॉडी वॉश, सुगंधित इंटिमेट वॉश किंवा इतर काहीही वापरणे टाळावे. खरंतर योनी स्वत:स्वच्छ होणारा अवयव आहे. या ठिकाणी साबण वापरल्यास पीएच संतुलन बिघडू शकते. यात असणारे पीएच संतुलन जीवाणू आणि संसर्गापासून संरक्षण करते. परंतु जेव्हा आपण योनीमध्ये साबण किंवा इंटिमेट वॉश वापरतो तेव्हा ते योनीचे पीएच सुंतलन बिघडवते ज्यामुळे संसर्ग वाढतो.
अनेक स्त्रिया त्यांची योनी साबणाने स्वच्छ करतात, इंटिमेट वॉश वापरतात, पण असं अजिबात करु नका. यामुळे खाज सुटणे, जळजळ होणे, पांढरा स्त्राव किंवा दुर्गंधीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्धभवू शकते.
त्याऐवजी आपण कोमट पाण्याने योनी स्वच्छ करायला हवी. लघवी केल्यानंतर टिश्यू पेपरने योनी स्वच्छ करा. कोणत्याही प्रकारचे वॉश किंवा क्रीम वापरु नका. मासिक पाळीदरम्यान दर २ ते ३ तासांनी पॅड बदला. योनीचे आरोग्य राखण्यासाठी महिलांनी तज्ञांच्या सल्ल्याचे नक्कीच पालन केले पाहिजे.
 
