Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोलेस्टेरॉल वाढणंच नाही तर कमी होणंही अत्यंत धोक्याचं, तब्येतीला छळतो 'हा' गंभीर धोका!

कोलेस्टेरॉल वाढणंच नाही तर कमी होणंही अत्यंत धोक्याचं, तब्येतीला छळतो 'हा' गंभीर धोका!

Low Cholesterol : कोलेस्टेरॉल शरीरातील वेगवेगळ्या क्रियांसाठी महत्वाचं असतं. त्यामुळे ते योग्य प्रमाणात शरीरात असणं गरजेचं असतं. पण याचं प्रमाण वाढलं तर अनेक गंभीर समस्या होतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:45 IST2025-07-07T14:08:03+5:302025-07-07T16:45:18+5:30

Low Cholesterol : कोलेस्टेरॉल शरीरातील वेगवेगळ्या क्रियांसाठी महत्वाचं असतं. त्यामुळे ते योग्य प्रमाणात शरीरात असणं गरजेचं असतं. पण याचं प्रमाण वाढलं तर अनेक गंभीर समस्या होतात.

What will happen when cholesterol level be lower than normal | कोलेस्टेरॉल वाढणंच नाही तर कमी होणंही अत्यंत धोक्याचं, तब्येतीला छळतो 'हा' गंभीर धोका!

कोलेस्टेरॉल वाढणंच नाही तर कमी होणंही अत्यंत धोक्याचं, तब्येतीला छळतो 'हा' गंभीर धोका!

Low Cholesterol : बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यानं वेगवेगळे हृदयरोगी, हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. हे आता जवळपास सगळ्यांनाच समजलं असेल. अनेकजण बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय करतात किंवा औषधं घेतात. पण शरीरासाठी आवश्यक कोलेस्टेरॉल कमी झालं तर काय होतं, हे अनेकांना माहीत नसतं. कोलेस्टेरॉल शरीरातील वेगवेगळ्या क्रियांसाठी महत्वाचं असतं. त्यामुळे ते योग्य प्रमाणात शरीरात असणं गरजेचं असतं. पण याचं प्रमाण वाढलं तर अनेक गंभीर समस्या होतात. इतकंच नाही तर जीव जाण्याचा धोकाही असतो. अशात आज आपण कोलेस्टेरॉल कमी झाल्यावर काय होतं हे पाहुया.

कोलेस्टेरॉल कमी झाल्यास काय होईल?

कोलेस्टेरॉल थेट संबंध हृदयाशी असतो. पण एका रिसर्चमधून हे समोर आले आहे की, जर कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिकच कमी झालं तर यानं हॅमरेजिक स्ट्रोक म्हणजे मेंदुमध्ये रक्तस्त्रावाचा आघात होण्याचा धोका वाढतो. 

रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, कोलेस्टेरॉल जर खूप कमी झालं तर हॅमेरेजिक स्ट्रोकचा धोका १६९ टक्के अधिक होतो. अमेरिकेत जास्तीत जास्त मृत्यूचं मुख्य कारण हृदयासंबंधी आजार आहे. केवळ अमेरिकेतच नाही तर भारतातही हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या कमी नाही. दरवर्षी अनेक लोकांचा जीव वेगवेगळ्या हृदयरोगांमुळे जातो.

या रिसर्चमध्ये ९६, ०४३ लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना ना कधी हार्ट अॅटॅक आला ना कधी स्ट्रोक ना कॅन्सर होता. रिसर्च सुरू करण्यापूर्वी या लोकांचं एलडीएल कोलेस्टेरॉलचं प्रमाण मोजण्यात आलं. त्यानंतर सलग ९ वर्षे या लोकांचं कोलेस्टेरॉल मोजण्यात आलं. अभ्यासकांनुसार, या रिसर्चच्या परिणामांमधून कोलेस्टेरॉल, हृदयरोग आणि हॅमरेजच्या केसेससोबत निपटण्यास चांगलीच मदत झाली.

कुणासाठी जास्त घातक?

लो कोलेस्टेरॉलची समस्या गर्भवती महिलांसाठी जास्त घातक ठरते. कारण यामुळे गर्भात वाढत असलेल्या बाळावर प्रभाव पडतो. जर गर्भधारणेदरम्यान कोलेस्टेरॉल लेव्हल कमी झाली तर यामुळे प्रीमॅच्युर डिलेव्हरी होण्याचा आणि बाळाचं वजन असण्याचा धोका राहतो.

कोणत्या कारणांनी कमी होतं कोलेस्टेरॉल?

दुर्मीळ आजार आणि फॅमिली हिस्ट्री असणाऱ्या लोकांना हायपोलिपिडेमियाचा (कोलेस्टेरॉल कमी झाल्याची स्थिती) धोका अधिक राहतो. कुपोषण, अ‍ॅनिमिया आणि शरीरात फॅट अ‍ॅब्जॉर्ब न झाल्यावरही रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं. थायरॉइड आणि लिव्हर डिजीजमुळेही कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक कमी होऊ शकतं. हेपेटायटिस सी इन्फेक्शन आणि गंभीर आजार किंवा जखम झाल्यावर हायपोलिपिडेमियाचा धोका असतो. जर वेळीच उपचार केले समस्या दूर होऊ शकते.

कोलेस्टेरॉल कसं ठेवाल नियंत्रित?

- जंक फूड, फास्ट फूडमुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे या गोष्टी खाणं टाळा.

- कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी भाज्यांमध्ये तेल कमी वापरा. तळलेले पदार्थ जास्त खाऊ नका.

- उकडलेल्या भाजा खाल्ल्यास जास्त उत्तम. यानं कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहील.

- चहा, कॉफी, मिल्क शेक प्या. त्यासाठी लो फॅट असलेलं दूध वापरा. क्रीम आणि प्रक्रिया केलेली डेअरी उत्पादनं टाळा.

- कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.

- कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवायचं असेल तर लाइफस्टाईलमध्ये बदल करा. सुस्त लाइफस्टाईल जास्त घातक ठरते.

Web Title: What will happen when cholesterol level be lower than normal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.