अनेकदा झोपेतून उठल्यानंतर आपल्याला आळस चढतो. दिवसभर थकवा जाणवतो, छोटेसे काम केले तरी दमल्यासारखे वाटते.(Vitamin B12 deficiency) असं सतत काही दिवस जाणवत असेल तर हे फक्त स्ट्रेस, झोपेची कमतरता किंवा कामाचा भार नाही. अनेकदा शरीरात एका महत्त्वाच्या पोषक घटकाचा स्तर कमी झाल्यामुळेही ही लक्षणं दिसतात.(Tiredness and weakness causes) ते म्हणजे व्हिटॅमिन बी १२. हे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. पण बदलेली जीवनशैली, अनियमित आहार, जास्त चहा-कॉफी आणि फास्टफूडची सवय यामुळे बी १२ ची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसू लागते. (Natural ways to increase B12)
ओलाव्यामुळे तुळशीच्या रोपाला बुरशी- कीड लागली? मातीत मिसळा पिवळी पावडर- भरगच्च पानांनी बहरेल तुळशी..
आपण आपल्या आहारात असे कोणते पदार्थ खायला हवे. ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन बी-१२ भरपूर मिळेल. यावर प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ खुशी छाब्रा यांनी याविषयी माहिती दिली. त्या म्हणतात हा पांढरा पावडर चमचाभर खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन बी १२ ची पातळी वाढू शकते. जाणून घेऊया सविस्तर
न्यूट्रिशनिस्ट सांगतात पौष्टिक यीस्ट हा साखर किंवा उसाच्या रसावर असणारा एक विशिष्ट प्रकारचा यीस्ट आहे. जो पूर्णपणे प्लांट बेस्ड आहे. हा पदार्थ आंबत नाही किंवा खराब देखील होत नाही. बेकिंगमध्ये वापरला जाणारा यीस्ट हा पूर्णपणे वेगळा असतो. न्यूट्रिशनिस्ट सांगतात दररोज फक्त एक चमचा पौष्टिक यीस्ट हा आपल्या दैनंदिन व्हिटमिन बी १२ च्या गरजांपैकी ४०-१००% पूर्ण करू शकते.
आपण हे यीस्ट पास्ता, सलाद, सूप किंवा भाज्यांसोबत खाऊ शकतो. त्यात चीज घातल्यास त्याचे टेस्ट आणखी छान लागते. जर आपली सतत लो एनर्जी, थकवा, दमल्यासारखं वाटणं, एकाग्रता कमी होणं किंवा मायग्रेनचा त्रास होत असेल तर ही फक्त साधी लक्षणं नसून व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचा इशारा असू शकतो. योग्य वेळी लक्ष दिलं, आहारात हा पांढरा पदार्थ खाल्ला आणि जीवनशैली सुधारली तर शरीर पुन्हा जोमाने काम करु शकते.
