Join us

लघवीचा बदललेला रंग सांगतो किडनी आजारी पडतेय, ‘असा’ रंग असेल तर लगेच गाठा डॉक्टर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2025 18:43 IST

what colour is urine in kidney failure : urine colour kidney disease symptoms : urine colour kidney failure signs : abnormal urine colour causes kidney problems : लघवीचे विविध रंग कोणते संकेत देतात आणि त्यावरून किडनी फेल्युअरची शक्यता कशी ओळखायची ते पाहा...

आपण सगळेच दिवसांतून अनेक वेळा लघवीला जातो. लघवीला गेल्यावर फारच क्वचित वेळेला आपण लघवीच्या रंगाचे निरीक्षण करतो.आपल्यापैकी बहुतेकजण लघवीच्या बदलत्या रंगाकडे (what colour is urine in kidney failure) थेट दुर्लक्षच करतात. परंतु खरंतरं, आपल्या लघवीचा रंग आपल्या आरोग्याची आणि विशेषतः किडनीच्या आरोग्याबाबत महत्वाचे संकेत देतात. आपल्या शरीरात होणारे अनेक लहान - सहान बदल अनेकदा गंभीर आजारांची चाहूल देतात. त्यातीलच एक महत्त्वाचा संकेत म्हणजे लघवीचा बदलता रंग(abnormal urine colour causes kidney problems).

साधारणपणे लघवी फिकट पिवळसर रंगाची असते, पण जर तिचा रंग सतत बदलत असेल ,गडद पिवळा, तपकिरी, गुलाबी किंवा लालसर दिसत असेल, तर हे फक्त पाण्याची कमतरता नसून किडनीच्या आरोग्याशी संबंधित गंभीर आजारांची लक्षणही असू शकतात. विशेषतः किडनी फेल्युअरसारख्या समस्येची सुरुवातीची चिन्हे लघवीच्या रंगावरून (urine colour kidney disease symptoms) दिसून येतात. लघवीचे विविध रंग कोणते संकेत देतात आणि त्यावरून (urine colour kidney failure signs) किडनी फेल्युअरची शक्यता कशी ओळखता येते, याबाबत सविस्तर माहिती ठाण्यातील किम्स हॉस्पिटल्सचे  यूरोलॉजिस्ट,डॉ. आकिल खान, यांनी onlymyhealth.com या संकेतस्थळाला दिली आहे. 

१. किडनी फेल झाल्यावर लघवीचा रंग कसा दिसतो ?

डॉ. आकिल खान सांगतात की, लघवीचा रंग आपल्याला किडनीच्या आरोग्याबद्दल सुरुवातीचे संकेत देतो आणि याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये. किडनी निकामी झाल्यावर, लघवी फेसाळ, गडद तपकिरी, चहाच्या रंगासारखी हलकीशी तपकिरी किंवा अगदी रक्तासारखी लाल देखील दिसू शकते. हे बदल अशासाठी होतात कारण खराब झालेली किडनी शरीरातील वेस्ट प्रॉडक्ट्स आणि प्रोटीन योग्यरित्या गाळू शकत नाही. उदाहरणार्थ, जास्त प्रोटीन लघवीतून बाहेर पडल्यास ती फेसाळ होऊ शकते, तर लघवीत रक्त आल्याने तिचा रंग लाल किंवा हलका तपकिरी दिसू शकतो.

भयानकच! सुंदर दिसण्यासाठी नाकातल्या केसांचं वॅक्सिंग कोण करतं, पण तिने केलं-पाहा व्हायरल व्हिडिओ..

२. लघवीशी संबंधित किडनी फेल होण्याची इतर लक्षणे...

डॉ. खान सांगतात की, लघवीच्या रंगाव्यतिरिक्त, किडनी फेल होण्याच्या संभाव्य लक्षणांबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.

जसे की, जर तुम्हाला तुमच्या मूत्राशयात (bladder) वेदना होत असतील किंवा पोटाच्या खालच्या भागात अस्वस्थता आणि दाब जाणवत असेल, तर हे किडनीशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकतात. याशिवाय, पायांना सूज येणे आणि पचनाशी संबंधित अडचणी देखील असे विशेष संकेत देतात.

आयुष मंत्रालयाने सांगितले ३ सोपे नियम! पचनसंस्था राहील ठणठणीत - पोटाचे विकार होतील कायम दूर...

पण या काळात, लघवीशी संबंधित बदल सतत होत राहतात, ज्याकडे तुम्हाला लक्ष देणे आवश्यक असते. फक्त लघवीचा रंग, प्रमाण आणि किती वेळा लघवी होते की नाही, या महत्वाच्या गोष्टींसोबतच खालील गोष्टींवरही लक्ष देणे गरजेचे असते. 

१. पुरेसे पाणी पिऊनही खूप कमी लघवी येणे.

२. रात्री वारंवार लघवीला जावे लागणे.

३. लघवी करताना वेदना किंवा जळजळ जाणवणे.

४. लघवी मोकळेपणाने न होणे.

५. किडनीत पाणी साठल्यामुळे पाय, घोटे किंवा डोळ्यांच्या आसपास सूज येणे.

प्रत्येकवेळा लघवीचा रंग बदलणे याचा अर्थ किडनी फेल होणे असाच होत नाही. काहीवेळा हे फक्त डिहायड्रेशन, औषधे किंवा खाण्यामुळे देखील होऊ शकते. तरीही, जर लघवीचा रंग सतत असामान्य असेल, लघवीला तीव्र वास येत असेल किंवा तिच्या प्रमाणात बदल होत असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक असते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स