Join us

प्रायव्हेट पार्टजवळ खाज येते, आग होते? डॉक्टर सांगतात, ३ कारणं - उशीर झाला तर वाढतो त्रास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2025 09:30 IST

itching near private parts: private part itching causes: vaginal itching home remedies : प्रायव्हेट पार्टला खाज लागण्याची अनेक कारणे असू शकतात. अशावेळी काय करायला हवं, जाणून घ्या.

शरीराच्या प्रत्येक भागाची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं असतं.(itching near private parts) मात्र काही संवेदनशील भागांकडे आपण जास्त प्रमाणात दुर्लक्ष करतो. त्यापैकी एक प्रायव्हेट पार्ट. या भागाच सतत खाज सुटत असेल, जळजळ होत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका.(private part itching causes) अनेकदा आपल्या रस्त्याने चालताना किंवा कुठेही प्रायव्हेट पार्टजवळ खाज लागते. अशावेळी नेमकं काय करावं आपल्याला सुचत नाही. (vaginal itching home remedies) प्रायव्हेट पार्टला खाज लागण्याची अनेक कारणे असू शकतात.(genital itching treatment) यामुळे मांड्यांजवळ किंवा गुप्तांगाजवळ लाल चट्टे किंवा डाग तयार होतात.(causes of itching in private parts6) अनेकदा खाज खूप प्रमाणात होऊ लागली की, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.  ही स्थिती कोणत्याही ऋतूमध्ये उद्भवते. पण पावसाळ्यात या समस्येचा जास्त प्रमाणात सामना करावा लागतो. अशावेळी काय करायला हवं. याचं नेमकं कारण काय जाणून घेऊया डॉक्टरांकडून. 

नाजूक भागाभोवतीची त्वचा काळी पडली, खाज सुटते? ४ उपाय - आठवड्याभरात काळपटपणा होईल दूर

लाल डाग किंवा चट्टे मांड्यांच्याभोवती, प्रायव्हेट पार्टजवळ खाज सुटत असेल तर याला टिनिया असं म्हणतात. टिनिया हा बुरशीजन्य संसर्ग आहे, ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. आपल्याला या समस्येपासून सुटका हवी असेल तर दैनंदिन दिनचर्येतील काही सवयींमध्ये बदल करायला हवा. 

आपल्याला वारंवार खाज सुटत असेल तर सगळ्यात आधी कपडे बदलायला हवे. टाइट जीन्स किंवा पॅन्ट घालू नका. त्यासाठी आपल्याला लूज कपडे ट्राय करायला पाहिजे. सुती कपडे चांगले राहातील. खूप घट्ट किंवा जाड कपड्यांमुळे घाम आणि उष्णतेमुळे खाजगी भागाभोवतीची त्वचा ओली राहते. यामुळे बुरशीजन्य संसर्ग वाढतो. 

कधीकधी आपण प्रायव्हेट पार्ट व्यवस्थित स्वच्छ करत नाही. यामुळे त्वचेवर घाम येऊ लागतो. तसेच काळ्या रेषा दिसू लागतात. जर शरीर योग्य पद्धतीने साफ केले नाही तर बुरशीजन्य संसर्ग होण्याची समस्या वाढते. डॉक्टर सांगतात वारंवार प्रायव्हेट पार्टजवळ खाज सुटत असेल तर कोणतेही औषधे, क्रीम्स लावू नका. यामध्ये केमिकल्स जास्त असतं. ज्यामुळे संसर्ग कमी होण्याऐवजी तो अधिक प्रमाणात वाढतो. हा त्रास खूप वाढत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

टॅग्स : आरोग्य