Join us   

जिने चढताना-चालताना दम लागतो? जीवनशैलीत करा ४ सोपे बदल; पन्नाशीनंतरही राहाल फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2024 1:42 PM

What Are 4 Ways I Can Increase My Stamina : स्टॅमिन जर कमी पडत असेल तर, जीवनशैलीत काही बदल करणं गरजेचं आहे..

स्टॅमिना आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे (Stamina). यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा, यासह मानसिक-शारीरिक कार्य करण्यास मदत होते. पण आजकाल जरा धावलं की दम लागतो, काहीही खाल्ल्यास त्याचा उर्जेमध्ये रुपांतर होत नाही (Health Care). स्टॅमिना कमी असल्याकारणाने आपल्याकडून नीट व्यायाम देखील होत नाही. ज्यामुळे वजन वाढतं, व गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आजकाल बरेच जण त्रस्त आहेत. पण तंदुरुस्त राहणं अशक्य असे नाही.

स्टॅमिना नसेल तर बऱ्याचदा आपण काहीही केलेलं नसतानाही थकवा जाणवतो. हा थकवा दूर करण्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस आहार घेणं गरजेचं आहेच. शिवाय जीवनशैलीत काही गोष्टीत बदल देखील करायला हवे. कोणत्याही सप्लिमेंट किंवा एनर्जी ड्रिंकशिवाय शरीराचा स्टॅमिना वाढवायचं असेल तर, जीवनशैलीत काही लहान बदल करा(What Are 4 Ways I Can Increase My Stamina).

स्टॅमिना वाढवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावे?

- पुरेशी झोप घेतली पाहिजे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे, मात्र त्यासाठी झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. म्हणजे रात्री वेळेवर झोपा आणि सकाळीही वेळेवर उठा.

दृष्टी सुधारते-कोलेस्टेरॉल कमी करते! रोज खा काळे मनुके; आरोग्य सुधारेल-हाडंही मजबूत होतील..

- वेळेवर जेवा. न्याहारीपासून दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणापर्यंतची वेळ निश्चित करा . रात्रीचे जेवण झोपण्याच्या सुमारे दोन तास आधी खा. रात्री ७ ते ८च्या दरम्यान जेवण करा. शिवाय रात्री १० पर्यंत झोपा. यामुळे आपल्याला सकाळी फ्रेश वाटेल, आणि आपण उत्साहाने वर्कआउट कराल.

- आपले अन्न नीट चावून खा. अन्न नीट चघळून खाल्ल्याने, पोटाला अन्न पचवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. ज्यामुळे आपली उर्जा वाया जात नाही. ही उर्जा आपण इतर कार्य करण्यासाठी वापरू शकता.

उन्हाळ्यात नेमकं किती पाणी प्यावं? शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून काय खावे-प्यावे? तज्ज्ञ सांगतात..

- व्यायाम किंवा इतर काही गोष्टी करताना धाप किंवा दम लागत असेल तर, बीटरूट, ओट्स, केळी, ब्राऊन राईस आणि पालक खाऊ शकता. यात पोषक घटकांचा खजिना आहे. ज्यामुळे आरोग्याला फायदाच होतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य