योनी ही महिलांच्या शरीरातील सर्वात नाजूक भाग आहे. अनेकदा आपल्या योनीमार्गात खाज किंवा जळजळ सुरु होते. (viginal disease) ही समस्या प्रत्येक वयोगटातील स्त्रियांना होते. रजोनिवृत्तीनंतर ५० टक्के महिलांना या आजाराला सामोरे जावे लागते.(viginal discharge and itching) तर हार्मोनल बदलांमुळे देखील तरुणींमध्ये योनिमार्गातील कोरडेपणा जाणवायला लागतो. तसेच मासिक पाळी किंवा औषधांचा दुष्परिणामामुळे देखील आपल्याला त्रास होतो. (Vaginal Health Disorders)
यीस्ट इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल योनिओसिस सारख्या कारणांमुळे आपल्याला हा त्रास होतो. (Vaginal Health and Hygiene) ज्यामुळे असामान्य स्त्राव आणि इतर लक्षण उद्भवतात. योनीमार्गात खाज सुटणे किंवा हे सामान्य आहे. अनेकदा आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये जळजळ आणि खाज येण्याची समस्या वारंवार भेडसावत असते. बरेचदा मासिक पाळी आल्यानंतर देखील आपल्याला योनीमार्गात जळजळ आणि सुटते. ही समस्या सामान्य वाटत असली तरी यांकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. योनीमार्गात खाज का येते? जाणून घेऊया डॉक्टर मानसी मेहंदळे यांच्याकडून
‘हे’ ५ पदार्थ खाऊ नका, वाढवतात पोटावरची चरबी- लिव्हरचे गंभीर आजार होण्याची शक्यता
1. योनीमार्गात खाज का सुटते?
- अनेकदा योनीमार्ग योग्य प्रकारे साफ न केल्यामुळे आपल्याला खाज सुटते. योनीमार्गात अनेक प्रकारचे स्त्राव होत असतात. व्हाईट डिसचार्ज किंवा लुकोरिया हे याचे प्रमुख कारण असू शकते.
- योनिमार्ग, मूत्रमार्ग आणि मलमार्ग हे तिन्ही एका लाईनमध्ये असतात. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तरीही देखील आपल्याला योनीमार्गात कोरडेपणा येऊन खाज सुटू शकते.
- आपल्या रक्तामध्ये पोटॅशिअम, सोडियमचे असे काही घटक असतात ज्यामुळे योनीमार्ग ओली राहाते. त्यामुळे देखील खाज सुटून कोरडेपणा येऊ शकतो.
- रक्तातील साखर वाढली किंवा HBA1c चे प्रमाण ८ पेक्षा जास्त असेल तर योनीमार्गात खाज सुटते.
- रजोनिवृत्ती दरम्यान इस्ट्रोजनची पातळी कमी होते. अशावेळी योनीमार्गातील ऊती पातळ आणि कोरड्या होतात. ज्यामुळे खाज आणि जळजळ सुटते.
2. उपाय
- सगळ्या आधी आपल्याला स्वच्छतेची काळजी घ्याला हवी. जर आपण वारंवार ही जागा ओली किंवा कोरडी ठेवत असू तर खाज सुटू शकते. जर योनीमार्गात कोरडेपणा जाणवत असेल तर कापसाची वात तयार करुन खोबऱ्याच्या तेलात बुडवा, ही वात आपल्या योनीमार्गात ठेवल्याने कोरडेपणा कमी होईल. खाज आणि जळजळच्या त्रासापासून सुटका होऊ शकते.
- दही हे प्रोबायोटिक आहे. यामध्ये पाव चमचा अळशीची पावडर मिक्स करुन सकाळी नाश्ता झाल्यानंतर घेतल्याने आराम मिळेल.
- जर हा त्रास आपल्याला अधिक प्रमाणात होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.