Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Vaginal health : नाजूक जागी खाज येते? ‘या’ चुकांमुळे वाढतो त्रास-पाहा योग्य काळजी घेण्याचे उपाय

Vaginal health : नाजूक जागी खाज येते? ‘या’ चुकांमुळे वाढतो त्रास-पाहा योग्य काळजी घेण्याचे उपाय

Vaginal health: Itching in the sensitive area? These mistakes increase the problem - see the steps to take proper care : नाजूक जागेची काळजी घेणे गरजेचेच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 15:02 IST2025-09-10T15:00:11+5:302025-09-10T15:02:17+5:30

Vaginal health: Itching in the sensitive area? These mistakes increase the problem - see the steps to take proper care : नाजूक जागेची काळजी घेणे गरजेचेच.

Vaginal health: Itching in the sensitive area? These mistakes increase the problem - see the steps to take proper care | Vaginal health : नाजूक जागी खाज येते? ‘या’ चुकांमुळे वाढतो त्रास-पाहा योग्य काळजी घेण्याचे उपाय

Vaginal health : नाजूक जागी खाज येते? ‘या’ चुकांमुळे वाढतो त्रास-पाहा योग्य काळजी घेण्याचे उपाय

अनेकदा स्त्रियांना व्हजायनल इन्फेक्शन नसतानाही वारंवार खाज सुटण्याचा त्रास होतो आणि त्यामुळे फार चिडचिड होते. हे नेहमीच संसर्गामुळे होतं असं नाही, तर शरीरात काही वेगळ्या कारणांमुळे अशी समस्या जाणवते. (Vaginal health: Itching in the sensitive area? These mistakes increase the problem - see the steps to take proper care)सर्वप्रथम समजून घ्यायला हवे की व्हजायनल भाग अत्यंत संवेदनशील असतो, त्यामुळे अगदी लहानशा चुकीमुळेही तिथे खाज किंवा अस्वस्थपणा जाणवू शकतो. तसेच काळजी घेणे फारच गरजेचे असते कारण नाजूक जागेचं दुखणं जास्त महागात पडू शकतं. 

१. यामागची एक महत्त्वाची कारणे म्हणजे त्वचेचा कोरडेपणा. बराच वेळ सॅनिटरी पॅड वापरणे, खूप घट्ट कपडे घालणे किंवा जास्त साबण, अति वॉश वापरणे यामुळे नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि खाज येऊ लागते. काहीवेळा अॅलर्जी होऊ शकते. सुगंधी साबण, टॅल्कम पावडर किंवा कपडे धुण्याचे डिटर्जंट यातील रसायनांमुळे व्हजायनल भागाला त्रास होऊन खाज येते. 

२. हार्मोनल बदलांमुळे ही समस्या अनेकांना सतावते. पाळीपूर्वी आणि पाळी नंतर काही दिवस त्वचा जास्त कोरडी पडते आणि त्यामुळे त्रास वाढतो. त्याचबरोबर जास्त साखर किंवा तेलकट आहार, ताणतणाव आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या सवयीही खाज वाढवतात.

उपाय म्हणून काही साध्या गोष्टी पाळल्या तर आराम मिळू शकतो. 
 कॉटनचे हवेशीरकपडे वापरावेत आणि दिवसातून दोनदा तरी बदलावेत. खूप घट्ट जीन्स किंवा सिंथेटिक कपडे टाळल्यास त्वचेला त्याचा फायदा होतो आणि ओलाव्यामुळे रॅश येत नाही. व्हजायनल वॉश, स्प्रे किंवा सुगंधी साबण वारंवार वापरण्याची गरज नसते. त्याऐवजी साध्या कोमट पाण्याने स्वच्छता करावी. जास्त खाजल्यास घरच्या घरी थंड पाण्याच्या शेकाने किंवा अ‍ॅलोव्हेरा जेलने आराम मिळतो. आहारात फळे, पाणी, ताक, दही यांचा समावेश करावा कारण ते शरीर थंड ठेवतात आणि आतून जळजळ कमी करतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही गोष्टी टाळणे गरजेचे असते. वारंवार खाजवणे, रासायनिक पावडर किंवा क्रीम  वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. पाळीदरम्यान पॅड योग्य वेळाने बदलणे, उष्ण व मसालेदार पदार्थ टाळणे आणि ताण कमी करणे हेही उपयुक्त आहे.

Web Title: Vaginal health: Itching in the sensitive area? These mistakes increase the problem - see the steps to take proper care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.