Join us   

रोज नियमित खा ५ पदार्थ, रक्तातली साखर राहील नियंत्रणात-टाळा डायबिटीसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2024 9:45 AM

Try 5 effective home remedies for blood sugar control : काही ठराविक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो.

मधुमेह ही सध्या आरोग्याशी निगडीत सर्वात महत्त्वाची समस्या झाली आहे. अगदी तरुणांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळेच मधुमेहाचा सामना करत असल्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे हे एक मोठे आव्हान झाले आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर आरोग्याच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाते. किडणी, यकृत, डोळे यांसारखे अवयव निकामी होण्यास मधुमेह कारणीभूत असतो. पण योग्य आहार, व्यायाम, औषधोपचार केले तर डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.  काही ठराविक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास हा डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे पदार्थ कोणते आणि त्याचा कशाप्रकारे समावेश करायचा पाहूया (Try 5 effective home remedies for blood sugar control)...

१. अॅपल व्हिनेगर 

अॅपल व्हिनेगर बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर असते, त्याचप्रमाणे ते रक्तातील साखर नियंत्रणात येण्यासही उपयुक्त असते. शरीरातील इन्शुलिनची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी आणि पेशींमधील  रक्तप्रवाहातून साखर काढण्यासाठी, खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी व्हिनेगर महत्त्वाचे काम करते. 

२. मेथ्या 

मेथ्या चवीला कडू असल्याने त्या जास्त खाल्ल्या जात नाहीत. मात्र मेथ्यांचा आहारात नियमित समावेश केल्यास खाल्लेल्या अन्नातील साखर त्यामध्ये शोषली जाते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. रात्रभर मेथ्या पाण्यात भिजवून ठेवल्या आणि सकाळी खाल्ल्या तर त्याचा चांगला फायदा होतो. 

३. झिंक 

आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या चांगल्या प्रमाणात झिंक असते. हे खनिज शरीरातील बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर असते त्याचप्रमाणे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही उपयुक्त असते. डायबिटीस असणाऱ्यांमध्ये झिंकचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असते. यासाठी ज्यांना मधुमेह आहे त्यांनी आहारात झिंक असलेल्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करायला हवा. 

४. दालचिनी

मसाल्यातील एक महत्त्वाचा पदार्थ असलेली दालचिनी इन्शुलिन रेझिस्टंस वाढवण्यास आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. जेवल्यानंतर वाढणारी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास दालचिनी फायदेशीर ठरते. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी किंवा काढा घ्यायला हवा. 

(Image : Google)

५. बेलाची पाने 

बेलाची पाने आणि फळांमध्ये रक्तातील साखर, युरीया आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात. अनेकांच्या रक्तातील साखर जेवणानंतर अचानक वाढते, अशावेळी ही साखर कमी करण्याची क्षमता या बेलाच्या पानांमध्ये असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने बेलाच्या पानांचा चहा किंवा काढा घेतल्याने ही साखर नियंत्रणात येण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह