Join us

हाताशी कायम असावा ज्येष्ठमधाचा तुकडा, अनेक त्रासांवर एकच रामबाण उपाय! पारंपरिक औषध फार महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2025 12:41 IST

Traditional Ayurvedic home remedies, eating Jeshtimadh is very helpful for health : जेष्ठमध खाण्याचे अनेक फायदे आहेत. खोकला, सर्दी सारेच होते बरे.

असे अनेक पदार्थ आहेत जे वर्षानुवर्षे औषधी गुणधर्मांसाठी वापरले जातात. त्यापैकीच एक म्हमजे जेष्ठमध. ही आयुर्वेदात प्राचीन काळापासून वापरली जाणारी एक अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती आहे. (Traditional Ayurvedic home remedies,  eating Jeshtimadh is very helpful for health )त्याच्या गोडसर मुळांमधून मिळणारा रस शरीरासाठी अनेक प्रकारे उपयुक्त ठरतो. जेष्ठमधाला शीतल मानले जाते. त्यातील थंडावा शरीरासाठी फार फायद्याचा असतो. शरीरातील पित्त शांत करण्यास त्याची मदत होते.  घशातील कोरडेपणा, खवखव, खोकला किंवा कफ या साऱ्या त्रासांवर जेष्टमध एकदम मस्त उपाय आहे. घशाला खरखर असेल बोलताना आवाज नीट येत नसेल किंवा घसा बसला असेल तर जेष्ठमध चघळल्याने त्वरित आराम मिळतो. त्याचा अगदी लहानसा तुकडा चघळत राहायचे.

जेष्ठमधाचा काढा तयार करुन पिणे फायद्याचे ठरते. हा काढा प्यायल्यावर श्वसनमार्ग अगदी मोकळा राहतो. त्यामुळे दमा, खोकला यासारख्या तक्रारी कमी होतात. घशाला फार आराम मिळतो. तसेच नाकात अडकलेली घाण आणि साचलेली सर्दी मोकळी होते. पचनसंस्थेसाठी जेष्ठमध एकदम लाभदायक असते. अनेकांना आम्लपित्ताचा त्रास असतो. त्यामुळे काहीही खाल्यावर छातीत जळजळ, पोटात गुडगुड होते. उलट्या होतात.  यांसारख्या त्रासावर जेष्ठमध उपयोगी ठरते. जेष्ठमधात सौम्य रेचक गुणधर्म त्यामुळे पचन सुरळीत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जेष्ठमध उपयुक्त आहे. तसेच त्वचेच्या समस्यांमध्ये आणि केस गळतीवरही उपयोगी ठरु शकते.

जेष्ठमधाचा वापर करताना तो कसा घ्यावा ह जाणून घ्या. साधारणतः वाळवलेली मुळे पावडर करून ती कोमट दुधाबरोबर किंवा मधाबरोबर घेतली जातात. घशाच्या त्रासासाठी जेष्ठमधाची काडी चघळणेही योग्य ठरते. काही वेळा काढा करून किंवा चुर्ण खाणे फायद्याचे ठरते. मात्र त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. दररोज अर्धा ते एक चमचा जेष्ठमध पुरेसे असते. जास्त प्रमाणात खाल्याने  रक्तदाब वाढू शकतो इतरही काही त्रास होऊ शकतात.

जेष्ठमधामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यातील दाहशामक, कफनाशक आणि पित्तशामक गुणधर्मामुळे ते घराघरात औषधासारखा वापरला जातो. योग्य प्रमाणात आणि नियमित वापरल्यास जेष्ठमध  शरीरासाठी फायद्याचे ठरते. 

टॅग्स : घरगुती उपायहोम रेमेडीअन्नहेल्थ टिप्स