Join us

घरात आंबेहळद आहे का? नाही? तर मग आजच घेऊन या.. ही हळद म्हणजे औषधच, कमालीचे फायदे आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2025 17:15 IST

This turmeric is a medicine, it has amazing benefits : आंबेहळद असते हळदीपेक्षाही औषधी. पाहा किती फायदे आहेत. नक्की वापरा.

आपण आहारामध्ये जी हळद वापरतो. ती फार पौष्टिक असते. जवळपास रोजच हळदीचा वापर आपण करतो. जखम असो किंवा मग सर्दी सगळ्यावर हळद उपयुक्त ठरते. (This turmeric is a medicine, it has amazing benefits.)या रोजच्या वापराच्या हळदीपेक्षाही औषधी हळदीची एक प्रजाती आहे. ती म्हणजे आंबेहळद. आयुर्वेदात तसेच अनेक भारतीय औषधांसंबंधीच्या पुस्तकांमध्ये आंबेहळदीचा उल्लेख आहे. अनेकांना हळदीची ही प्रजाती माहितीच नाही. (This turmeric is a medicine, it has amazing benefits.)पण घरात आंबेहळद असायलाच हवी. ती फार उपयुक्त असते. दिसायला आल्यासारखी असते. किसून वापरता येते उगाळून वापरता येते. उकळूनही वापरता येते. अनेक कमालीचे फायदे आहेत. 

१. आंबेहळद म्हणजे त्वचेसाठी वरदानच आहे. आपण त्वचेवरचे डाग जावे किंवा पिंपल्स जावे यासाठी अनेक उपाय करत असतो. पण जर आठवड्यातून दोनदा जरी आंबेहळदीचा लेप चेहर्‍याला लावलात तर इतर उपाय करावेच लागणार नाहीत. ऊन्हामुळे चेहर्‍याची पार वाट लागून जाते. चेहरा अगदीच काळवंडतो. त्यावरही आंबेहळद हा मस्त उपाय आहे. चेहऱ्याचा जो खरा रंग आहे तो पुन्हा दिसायला लागतो. 

२.  जठराग्नि हा पचनसंस्थेतील एक महत्वाचा भाग आहे. पोटात अन्न गेल्यावर त्याचे रुपांतर ऊर्जेत करण्यासाठी जठराग्नि गरजेचा असतो. ही पचन क्रिया सुरळीत व्हावी यासाठी आंबेहळद फायदेशीर ठरते. 

३. अनेकदा रक्त गोठून एखादा अवयव काळा निळा पडतो. ते रक्त तसेच गोठलेले राहिले तर गाठ तयार होऊ शकते. असे होऊ नये  म्हणून गोठलेल्या रक्तावर वेळीच उपाय करायला हवे. आंबेहळदीचा लेप गोठलेल्या अवयवावर लावल्याने रक्त सुटते. 

४. आहारामध्ये आंबेहळदीचा समावेश करून घ्या. त्याचे लोणचेही तयार केले जाते. ते खाल्ले तरी फायद्याचे ठरेल. इतरी पदार्थांमध्ये वापरा. काढा करून प्या. आंबेहळदीचा वापर केल्याने भूक सुधारते. योग्य तेवढीच भूक लागते.

५. पित्ताचा त्रास असेल तर आंबेहळद घरात असायलाच हवी. आंबेहळद ही उत्तम पित्तशामक आहे. उगाळून पोटाला लावा. काढा करून प्या. पित्ताचा त्रास हळूहळू नाहीसा होईल.      

टॅग्स : आरोग्यब्यूटी टिप्सअन्नहोम रेमेडी