Heart Attack Causes : प्रमाणापेक्षा जास्त स्ट्रेस, चुकीची लाइफस्टाईल, चुकीचा आहार, कमी झोप अशा काही कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अॅटॅकच्या केसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. हेल्थ एक्सपर्ट नेहमीच हृदयरोग आणि हार्ट अॅटॅकच्या कारणांबाबत माहिती देत असतात. त्यात ते आवर्जून सांगताना दिसतात की, आपल्याच काही सवयींमुळे हार्ट अॅटॅक येण्याचा धोका अधिक वाढू शकतो. म्हणजे आपल्याच अशा काही चुकीच्या सवयी असतात, ज्यांकडे आपण दु्र्लक्ष करतो आणि मग हार्ट अॅटॅकचा सामना करावा लागतो. या छोट्या छोट्या सवयी केवळ हृदयासाठीच नाही तर आपल्या एकंदर आरोग्यासाठीही खूप घातक ठरतात. चला तर पाहुयात कोणत्या आहेत या सवयी ज्या हार्ट अॅटॅकचं कारण ठरू शकतात.
कमी झोप
झोप आपल्या शरीरासाठी किती महत्वाची असते हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. निरोगी राहण्यासाठी, आळस घालवण्यासाठी आणि शरीर रिपेअर करण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं ठरतं. जर आपण रोज पुरेशी झोप न घेता रात्री उशिरापर्यंत टीव्ही, मोबाईल बघत असाल तर ही सवय फार धोकादायक आहे. रोज ७ तास झोप घेतली नाही तर हृदयाचं आरोग्य बिघडतं. जर आपल्याला हार्ट अॅटॅकचा धोका कमी करायचा असेल तर रोज रात्री ७ ते ८ तासांची चांगली झोप घेणं खूप गरजेचं आहे.
शारीरिक हालचाल न करणं
आपण जर कामामुळे तासंतास एकाच जागी बसून राहत असाल, कोणताही व्यायाम अजिबात करत नसाल किंवा आपलं चालणं - फिरणं फार कमी असेल तर वेळीच या सवयी बदला. हृदय जर फिट आणि निरोगी ठेवायचं असेल तर कसाही वेळ काढून आपण कोणताही व्यायाम केला पाहिजे. रोज किमान ३० मिनिटं फिजिकल अॅक्टिविटी करणं गरजेचं आहे. तरच आपलं हृदय निरोगी राहू शकतं आणि आपण हार्ट अॅटॅकचा धोका टाळू शकता.
प्रोसेस्ड फूड - जंक फूड
हल्ली प्रोसेस्ड फूड, जंक फूड, सॅच्युरेटेड फॅट, जास्त साखर किंवा जास्त मीठ खाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. ही सवय आपल्यासाठी जीवघेणी ठरू शकते. या गोष्टींमुळे हृदयाचं तंत्र बिघडतं. त्याशिवाय तंबाखू किंवा सिगारेटही हृदयाचं नुकसान करतं. हार्ट अॅटॅकचा धोका कमी करण्यासाठी आपल्या या सवयी वेळीच बदला. खाण्याच्या मोहात आपलं मोठं नुकसान होऊ शकतं.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय खाल?
शारीरिक हालचाल, चांगल्या सवयी यांसोबतच हृदय निरोगी ठेवण्यात सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती, हिरव्या पालेभाज्या आणि फळांची. तसेच बदाम, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे, कलिंगडाच्या बियाही फायदेशीर असतात. त्यासोबतच दूध, दही, ताक यानेही आरोग्य चांगलं राहतं. ग्रीन, ब्लॅक टी चं सेवन करूनही शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करू शकता. म्हणजेच याने हृदय निरोगी राहतं. शरीरात रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
Web Summary : Stress, poor lifestyle, and lack of sleep increase heart attack risk. Inadequate sleep, lack of exercise, and processed foods are major contributors. Adopt healthy habits like exercise, sufficient sleep, and a balanced diet with fruits and vegetables to protect your heart.
Web Summary : तनाव, गलत जीवनशैली और नींद की कमी से हार्ट अटैक का खतरा बढ़ता है। अपर्याप्त नींद, व्यायाम की कमी और प्रोसेस्ड फूड मुख्य कारण हैं। व्यायाम, पर्याप्त नींद और फल-सब्जियों से भरपूर संतुलित आहार जैसी स्वस्थ आदतें अपनाकर अपने हृदय की रक्षा करें।