एक फारच कॉमन समस्या आहे. ती म्हणजे शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता. शरीरात सतत कोणत्या तरी जीवनसत्त्वाचा अभाव असतो. योग्य आहाराच्या प्रभावामुळे असे होऊ शकते. एखाद्या आजारामुळे ही कमतरता उद्धवू शकते. प्रत्येक जीवनसत्त्व वेगवेगळ्या शारीरिक गरजा पुरवते. त्यामुळे प्रत्येक जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणे व परिणाम वेगवेगळे असतात. या कमतरतेवर उपाय म्हणून, मेडिकल मध्ये व्हिटॅमिन्स च्या गोळ्या मिळतात. कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे काय होते ते जाणून घेऊ या.
जीवनसत्त्व 'ए'
चांगल्या नेत्र दृष्टीसाठी 'ए' जीवनसत्त्व महत्त्वाचे असते. तसेच शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता टिकून राहण्यासाठी 'ए' जीवनसत्त्व फार गरजेचे असते. प्रजनन संस्थेसाठी ही फार महत्त्वाचे असते. हृदय ,आतडी, किडनी यासाठी ही 'ए' जीवनसत्त्वाची फार गरज असते. अंड्यातून मोठ्या प्रमाणात 'ए' जीवनसत्त्व मिळते. मांसाहारातून जास्त प्रमाणात 'ए' जीवनसत्त्व मिळते. मग शाकाहारी लोकांनी काय करावं? टॉमॅटो मध्येही 'ए' जीवनसत्त्व असतं. पण जर शरीरात 'ए' जीवनसत्त्वाची कमी आहे. दृष्टी कमी आहे तर, त्यासाठी व्हिटॅमिन 'ए'च्या गोळ्या मिळतात.
'बी' जीवनसत्त्व
'बी' जीवनसत्त्व खास करून पचनसंस्थे संदर्भात कार्यरत असते. अन्न पचवणे आणि त्यापासून ऊर्जा मिळवण्यासाठी याची गरज असते. मेंदूसाठी हे फार महत्त्वाचे असते. भाज्या, बिया, मासे आदी मधून 'बी' जीवनसत्त्व मिळते. याच्याही गोळ्या मिळतात.
'सी' जीवनसत्त्व
हाडांना मजबुती देण्याचे, त्वचेची काळजी घेण्याचे, रक्त स्त्राव सुरळीत चालवण्याचे काम 'सी' जीवनसत्त्वाचे असते. पपई, किवी, केळं आदी पदार्थांतून भरपूर 'सी' जीवनसत्त्व मिळते. याची ही गोळी मेडीकल ला मिळते.
व्हिटॅमिन्स च्या गोळ्या घ्याव्यात का ?
तज्ज्ञ सांगतात या गोळ्या घेणे फायद्याचेच आहे. शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी या गोळ्या चांगला उपाय आहेत. जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी झाले तर, अनेक आजार होतात. त्यामुळे काळजी घ्या. इतरही अनेक जीवनसत्त्व असतात. त्याच्याही गोळ्या मिळतात. या गोळ्या घ्याव्या का नाही हा प्रश्न आपल्याला पडतो. या घेण्यात काही धोका नाही. तरी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगलं.