Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आधी पायांवर दिसतात हृदयात गडबडीचे संकेत, काणाडोळा केला तर वाढतो जीव जाण्याचा धोका

आधी पायांवर दिसतात हृदयात गडबडीचे संकेत, काणाडोळा केला तर वाढतो जीव जाण्याचा धोका

Heart Disease Signs : हृदयात काहीही गडबड झाली तर पायांवर त्याचा प्रभाव दिसतो. आज आपण असेच काही संकेत पाहणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:44 IST2025-07-17T11:54:02+5:302025-07-17T15:44:35+5:30

Heart Disease Signs : हृदयात काहीही गडबड झाली तर पायांवर त्याचा प्रभाव दिसतो. आज आपण असेच काही संकेत पाहणार आहोत.

Symptoms of heart disease or heart attack seen in the legs | आधी पायांवर दिसतात हृदयात गडबडीचे संकेत, काणाडोळा केला तर वाढतो जीव जाण्याचा धोका

आधी पायांवर दिसतात हृदयात गडबडीचे संकेत, काणाडोळा केला तर वाढतो जीव जाण्याचा धोका

Heart Disease Signs : जर आपल्याला हृदयरोग झाला असेल तर शरीर वेळोवेळी वेगवेगळे संकेत देत असतं. फक्त ते संकेत आपण ओळखायचे असतात. असं अजिबात नाही की, हृदय दुखत असेल म्हणजेच हृदयरोग झाला. शरीराच्या वेगवेगळ्या भागात हृदयरोगाचे संकेत दिसू शकतात. आपल्याला अंदाजही नसेल, पण हृदयरोगाचा काही संकेत पायांवरही दिसतात. कारण हृदयाच्या नसा थेट पायांसोबत जुळलेल्या असतात. त्यामुळे हृदयात काहीही गडबड झाली तर पायांवर त्याचा प्रभाव दिसतो. आज आपण असेच काही संकेत पाहणार आहोत.

पायांमध्ये वेदना, सुन्न होणे

पायांमध्ये सतत वेदना होत असेल, खासकरून रात्री किंवा चालताना. तर हा हृदयरोगाचा संकेत असू शकतो. पायांमध्ये रक्तप्रवाह योग्यपणे होत असल्याचं हे लक्षण आहे. त्यामुळे नेहमीच पाय दुखत असतील किंवा सुन्न पडत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पायाच्या त्वचेचा रंग बदलणे

पायाच्या त्वचेचा रंग जर पिवळा पडला असेल, मळकट किंवा निळा झाला असेल तर हा सुद्धा हृदयरोगाचा संकेत असू शकतो. हेही पायांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होत नसल्याचं लक्षण आहे. त्यामुळे जराही उशीर न करता डॉक्टरांना दाखवा.

पायांवरील जखम लवकर न भरणे

जर पायांवर एखादी जखम झाली असेल आणि ती लवकर बरी होत नसेल तर हा रक्तप्रवाहात गडबड असल्याचा संकेत असू शकतो. डायबिटीसच्या रूग्णांमध्ये सुद्धा हीच समस्या बघायला मिळते, हा आजार हृदयरोगाचं एक मुख्य कारण आहे.

पायांवरील केस विरळ होणं

पायांवरील केस कमी होणं किंवा ते गळणं पायांमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित होत नसल्याचं लक्षण आहे. शरीरात सगळ्या भागात रक्त पुरवठा सुरळीत होत नसल्याचं हे लक्षण आहे. अनेकदा ही समस्या हृदय स्लो झाल्यामुळे होते.

पायाच्या बोटांची नखं हळू वाढणे

पायाच्या बोटांची नखं जर खूप हळू वाढत असतील किंवा त्यांच्या रंगात बदल झाला अससेल तर हा सुद्धा ब्लड सर्कुलेशन बरोबर होत नसल्याचा संकेत असू शकतो. यावरून हे दिसून येतं की, हृदय योग्यपणे काम करत नाहीये.

Web Title: Symptoms of heart disease or heart attack seen in the legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.