Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हॉर्ट अटॅक येण्याच्या ४८ तास आधी शरीरात दिसतात ही लक्षणं; धोका ओळखा-जीव वाचवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:45 IST

Symptoms In Body 48 Hours Before heart Attack : कायम थकवा येणं हे हॉर्ट अटॅकचं महत्वाचं लक्षण असू शकतं.

हॉर्ट अटॅक ही अचानक येणारी गोष्ट वाटत असली तरी शरीर अनेकदा त्याचे संकेत  काही तास आधीच देते. हॉर्ट अटॅक म्हणजेच हृदय विकाराचा झटका आल्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो (Body Gives These Symptoms Before Heart Attack). पण हॉर्ट अटॅक येण्याआधी शरीरात काही बदल दिसतात ज्यातून शरीर  हॉर्ट अटॅकची धोक्याची सुचना देते. अशी काही लक्षणं दिसल्यास तुम्ही जराही विलंब न लावता डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करायला हवी. (Symptoms In Body 48 Hours Before heart Attack)

 थकवा येणं

कायम थकवा येणं हे हॉर्ट अटॅकचं महत्वाचं लक्षण असू शकतं.  तुम्हाला जास्त थकवा येत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा. याशिवाय तर तुम्हाला छातीत वेदना होत असतील, अस्वस्थ वाटत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. साधी एसिडीटी झाली असेल असं समजून दुर्लक्ष करू नये.  हार्ट अटॅक येण्याआधी श्वास घ्यायला त्रास होणं, वेदना इतर लक्षणं दिसून येतात. (Ref)

हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते हार्ट अटॅक येण्याच्या  एक ते दोन दिवस आधी  म्हणजेच  ४८ तास आधी शरीरात अशी लक्षणं दिसतात. ज्यामुळे हॉर्ट अटॅक येऊ शकतो असे संकेत मिळतात.  या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. दुर्लक्ष केल्यास तब्येतीला धोका उद्भवू शकतो. जर तुम्हाला हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल  तर लाईफस्टाईल सुधारायला हवी. पालक, ब्रोकोली, डाळींब, सफरचंद,  ऑलिव्ह ऑईल  आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.  या सुपर फूड्‍सचा आहारात समावेश करायला हवा.

छातीत अस्वस्थता जाणवते

हे सर्वात महत्वाचे लक्षणं आहे. तुम्हाला छातीत तीव्र वेदना न होता फक्त दबाव, जडपणा किंवा कडकपणा जाणवू लागला असेल तर हे लक्षण सतत दिसत नसून मध्येच येते आणि जाते. 

श्वास घ्यायला त्रास होणं

कोणतेही कष्टाचे काम न करता किंवा अगदी बसल्या जागी धाप लागणं किंवा दीर्घ श्वास घेण्यास अडचण येणं. हे रक्साभिसरण नीट होत नसल्याचे लक्षणं असू शकते.

शरीराच्या वरच्या भागात वेदना

फक्त छातीतच नाही. तर ती कळ डाव्या हाताला, खांद्याला, पाठीला मानेला किंवा अगडी जबड्यापर्यंत पसरू शकते. ही वेदना ४८ तास आधीपासून अधून मधून जाणवते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Heart attack: Recognize these symptoms 48 hours before, save your life.

Web Summary : Heart attack symptoms can appear 48 hours prior. Fatigue, chest discomfort, breathing issues, and upper body pain are key indicators. Seek immediate medical attention if these signs arise.
टॅग्स : हृदयविकाराचा झटकाहृदयरोग