राहणीमान, आवडीनिवडी, सवयी हळूहळू सगळं बदलत चाललं आहे.(Smoking cigarettes is more dangerous for women than men) बदल ही काळाची गरज असली तरी, व्यसनांचे वाढते प्रमाण नक्कीच स्वीकारण्याजोगे नाही. पूर्वी आईला कळलं तर या भीतीने तरी व्यसनांचं प्रमाण कमी होतं. पण आता आईवडिलांचेच व्यसन वाढले. फ्रेंडली पॅरेंट्स या संकल्पनेचा अवलंब करणारे पालक मुलांना घेऊन व्यसन करतात.(Smoking cigarettes is more dangerous for women than men) सगळ्यात जास्त वाढतं प्रमाण सध्या सिगारेट प्रेमींचं आहे. सिगारेट ओढणे कायद्याने मान्य असल्याने व्यसन करणे न करणे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सिगारेटच्या पाकिटावरसुद्धा "सिगारेट पिऊ नका. शरीरासाठी हानिकारक आहे." असे लिहिले असते. मुळात व्यसन करू नये आणि त्यात सिगारेट तर ओढू नये.
आजकाल तरुण मुल-मुली रस्त्यांवर बिनधास्त धूर हवेत उडवताना दिसतात. पोरांनी "फिक्र धुएमे उडाता चला गया" या गाण्याला फारच मनावर घेतलं आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले की, एक सिगारेट आयुष्य १० ते १२ वर्षांनी घटवते. सिगारेट आयुष्याचा कालावधी कमी करते.(Smoking cigarettes is more dangerous for women than men) 'यूनीव्हर्सिटी कॉलेज लंडन' या महाविद्यालयातील संशोधकांनी 'ब्रिटीश डॉक्टर्स स्टडी' व 'द मिलियन वूमन स्टडी' यांच्या मदतीने या विषयावर अभ्यास केला. डॉक्टर सारा जॅक्सन तंबाखू व मद्यार्काच्या परिणामाचा अभ्यास करतात.(Smoking cigarettes is more dangerous for women than men) त्यांनी ही माहिती दिली आहे. स्मोकर्स वर्गाच्या फक्त आतड्यांनाच धोका नसून, आयुष्यालाही धोका आहे. २० सिगारेट असलेले एक पाकिट आयुष्याचे सात तास हिरावून घेते.
संशोधनानुसार, एक सिगारेट पुरूषाच्या आयुष्याची १७ मिनिटे कमी करते. आजकाल सिगारेट ओढणाऱ्या मुलींचं प्रमाण फार वाढलं आहे. हा अभ्यास सांगतो की, एक सिगारेट महिलेच्या आयुष्याची २२ मिनिटे कमी करते. सिगारेट शरीराची वाट लावते. ओठ काळे पडून सुखतात. एवढंच नव्हे तर तज्ज्ञ सांगतात की, सिगारेट प्रजननक्षमता कमी करते. तरी लोकं सेवन करतातच. आयुष्याचा १० ते १५ वर्षांचा कालावधी कमी होऊ देऊ नका. एक निरोगी आयुष्य जगा. सिगारेट सोडा. आयुष्याचा काळ वाढवा.