Join us

कानातला मळ साफ करता? चुकूनही घालू नका तेल, व्हाल कायमचे बहिरे- ३ पद्धतीने साफ करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2025 16:49 IST

earwax removal: how to clean ears safely: ear cleaning tips: डॉक्टर म्हणतात कानातील मळ साफ करु नका, यामुळे आपल्याला बहिरेपणा येऊ शकतो.

अनेकदा केस धुताना किंवा आंघोळ करताना कानात पाणी जाते. ज्यामुळे आपल्याला नीटसे ऐकू येत नाही. अशावेळी आपण कान साफ करण्याचा विचार करतो.(earwax removal) इतकंच नाही तर आपल्यापैकी बरेच जणांना कानात मळ साचला की पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे थोडंसं तेल टाकू या, म्हणजे मळ आपोआप बाहेर येईल.(how to clean ears safely) पण हीच सवय आपल्या कानांसाठी सर्वात धोकादायक ठरु शकते.  अनेकदा कान साफ करण्यासाठी आपण पिन किंवा इअर बड्सचा वापर करतो.(ear cleaning tips) ज्यामुळे कानांना इजा होण्याची शक्यता असते.(home remedies for earwax) कानाच्यावर पिवळा, चिकट थर जमा होतो.(ear care mistakes) याचे कार्य कानाला धूळ, घाण आणि बॅक्टेरियापासून वाचवणं असते. त्यातील ओलावा टिकून ठेवण्याचे काम ते करतं.(ear care routine for adults and kids) कानाला नुकसान झाल्यास कान दुखू लागतो, जडपणा येणे, ऐकू न येणे किंवा खाज सुटण्याच्या समस्या वाढतात. डॉक्टर म्हणतात कानातील मळ साफ करु नका, यामुळे आपल्याला बहिरेपणा येऊ शकतो. 

वर्ष वाईट गेलं, लोकांनी ट्रोल केलं, टिममधून डच्चू मिळाला पण ती खचली नाही! जेमिमाची ' अशीही' गोष्ट

डॉक्टर म्हणतात आपण कान स्वच्छ करण्यासाठी इयर बड्सचा किंवा कान साफ करणाऱ्यांची मदत घेतात. हे आपल्या कानांसाठी धोकादायक आहे. यामुळे कानाच्या नाजूक आवरणाला नुकसान होऊ शकते. कधीकधी यातील कापसाचा तुकडा आत अडकू शकतो. 

जर कानात जास्त प्रमाणात मळ साचला असेल तर जडपणा आपल्याला जाणवू लागतो. ऐकू न येणे, दुखणे किंवा खाज सुटू शकते. सतत खोकला किंवा कानात आवाज गुंजण्याची लक्षणे जाणवतात. कानातील मळ काढण्यासाठी काय करावं. 

आपल्या कानात खूप मळ साचला असेल तर सगळ्यात आधी तो मऊ करा. यासाठी आपण कानांचा ड्रॉप वापरु शकतो. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा याचे काही थेंब कानात घाला. ज्यामुळे घाण बाहेर येईल. जर कानातील मळ बाहेर निघत नसेल तर ईएनटी डॉक्टरांची भेट घ्या. डॉक्टर कानांची व्यवस्थित स्वच्छता करुन देतात. ज्यामुळे आपल्याला कोणतीही इजा होत नाही. 

डॉक्टर सांगतात कानात कधीही गरम तेल, कापसाचे बोळे आणि तीक्ष्ण वस्तू घालू नका. यामुळे कानाचा पडदा बंद होऊ शकतो. आपण योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.   

English
हिंदी सारांश
Web Title : Don't use oil to clean ears; it can cause deafness!

Web Summary : Cleaning ears with pins or buds is dangerous. Avoid oil; it can cause deafness. Soften wax with drops, consult an ENT doctor for safe cleaning.
टॅग्स : आरोग्य