Join us   

थंडीमुळे घसा खवखवणे, सर्दी- खोकला, श्वसनाचा त्रास वाढला? पूजा माखिजा सांगतात १ सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 3:03 PM

Use of Curry Leaves for Throat Irritation, Cold and Constant Cough: हिवाळा सुरू झाला की घसा खवखवणे, सारखा खोकला येणे, नाक बंद होणे असे त्रास अनेक जणांना होतात. यावर एक उत्तम घरगुती उपाय सांगत आहेत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा.

ठळक मुद्दे हा उपाय केल्यामुळे वरील सर्व त्रास तर कमी होतीलच पण हिवाळ्यामुळे त्वचा कोरडी पडण्याचा जो त्रास होतो, तो देखील कमी होईल.

थंड वातावरण अनेक जणांना सहन होत नाही. त्यामुळे या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, घसादुखी, कफमुळे नाक बंद होणे, छातीत कफ साचणे किंवा श्वसनाशी संबंधित वेगवेगळे त्रास (Throat Irritation, Cold and Constant Cough) खूप जणांना होत असतात. असा त्रास हिवाळ्याचे दोन- तीन महिने सतत होत असतो. त्यामुळे मग औषधी तरी किती घेणार असा प्रश्न पडतो. म्हणूनच असा कोणताही त्रास होत असेल तर सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा (Pooja Makhija) यांनी सांगितलेला हा उपाय करून बघा. हा उपाय केल्यामुळे वरील सर्व त्रास तर कमी होतीलच पण हिवाळ्यामुळे त्वचा कोरडी पडण्याचा जो त्रास होतो, तो देखील कमी होईल.(home remedies)

सर्दी- खोकला, घसादुखीवर पुजा माखिजा यांनी सांगितलेला उपाय वरील सर्व त्रासांवरचा एक सोपा उपाय म्हणजे कढीपत्त्याची पाने. जवळपास सर्वच भारतीय स्वयंपाकघरात अगदी सहज आढळून येणारा हा पदार्थ श्वसनाचे विकार दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो.

World Saree Day: साडीचं लावण्य! १० प्रसिद्ध भारतीय साड्या, बघा यापैकी तुमच्या वॉर्डरोबमध्ये किती आहेत

त्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, बी२, ई यासोबतच कॅल्शियम, लोह ही खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात. श्वसनाचे विकार दूर करण्यासोबतच डिसेंट्री, डायरिया, मधुमेह, मॉर्निंग सिकनेस, नॉशिया असे त्रास कमी करण्यासाठीही कढीपत्ता उपयोगी ठरतो. 

 

कढीपत्त्याचे फायदे १. पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते.

२. सर्दी, खोकला, कफ, घसादुखी अशा त्रासांवर गुणकारी.

३. त्वचा, डोळे आणि केसांसाठी उत्तम.

डाएट करायचं ठरवता, पण काही दिवसांतच बारगळून जातं? ३ टिप्स, वेटलॉससाठी होईल फायदा

४. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त.

५. जखम लवकर भरून निघण्यासाठी फायदेशीर. 

 

कसा करायचा कढीपत्त्याचा वापर? कढीपत्ता आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकून तर खातोच. पण वरील सर्व फायदे आणि कढीपत्त्याचे आणखी लाभ मिळवायचे असतील तर कढीपत्त्याची १० ते १५ फ्रेश पाने मिक्सरमधून काढून एक ग्लास पाणी किंवा कोणत्याही ज्यूसमध्ये टाका आणि प्या. आठवड्यातून ४ ते ५ वेळा हा प्रयोग करावा, असं पूजा माखिजा सांगतात.    

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजीहोम रेमेडी