दात खराब झाल्यावर ते काढून टाकणं आणि कवळी लावणं असंच अनेकजण करतात. पण आता विज्ञान फार पुढे गेले आहे. अनेक नव्या उपचारांचा शोध लागला आहे. दातांच्या विविध उपचारांपैकी एक म्हणजे डेंटल इम्प्लांट. त्याचे फायदे तोटे योग्य उपचार मात्र समजून घेतले पाहिजे. 'लोकमत सखी'शी संवाद साधताना, ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिकचे रिजनल डायरेक्टर डॉ.आकाश अय्यर यांनी डेंटल इम्प्लांटचे फायदे तोटे समजावून सांगितले आहे.(oral health issues, dental health care orthosquare clinic- dental implant option.)
'बजाज फिनान्स', ‘सेव्हइन’, 'शॉप से' यासारख्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थानीं दंतचिकित्सा करणाऱ्या ऑर्थेस्क्वेअर क्लिनिक्स यांच्यासोबत करार केला असून त्याद्वारे आता ‘केअर नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच आधी तपासणी, उपचार करून घ्या आणि नंतर उपचारांचे पैसे भरा अशी सवलत ग्राहकांना मिळते आहे. ऑर्थोस्क्वेअर अंतर्गत देशभरात १०० पेक्षा जास्त डेंटल क्लिनिक आहेत. त्या क्लिनिकमधील हजारो रुग्णांना आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांमार्फत झीरो कॉस्ट इएमआय देऊ करण्यात आला आहे.
काय आहे डेंटल इम्प्लान्ट?
डॉ.आकाश अय्यर सांगतात, जर दात तुटला असेल, खराब झाला असेल, तर त्या जागेवर टायटेनियम स्क्रूच्या मदतीने नवीन दात लावला जातो. एकच नाही तर बत्तीसच्या बत्तीस दात काढून लावता येतात. दात नसलेल्या जागेतील हाडात रोपण(इम्प्लान्ट) बसवला जातो. त्याला हाडांशी जुळवून घेण्यास सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागतो. तीन महिन्यांनंतर कनेक्टर व कॅप लावली जाते. हे लावलेले दात अगदी खऱ्या दातांसारखे दिसतात आणि कामही करतात.
नक्की काय चांगले कवळी का डेंटल इम्प्लान्ट ?
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, कवळी ही जुनी डेंटिस्ट्री आहे. एक साचा बनवून त्यावर ऍक्रेलिकचे दात बसवले जातात. या दातांचा मुळ आधार म्हणजे हाडे व हीरड्या. कवळीचा पूर्ण भार त्यांच्यावर असतो. वरची कवळी टाळूचा आधार घेते. कवळीमुळे हाडे व हिरड्यांवर फार जोर येतो. कवळी सैल होते आणि सरकते. मात्र डेंटल इम्प्लान्टमध्ये रोपणावर भार असतो. तोंडाच्या सर्व हालचालींचा भार रोपणाने घेतल्याने हिरड्या झिजत नाहीत.(oral health issues, dental health care orthosquare clinic- dental implant option.)
डेंटल इम्प्लान्ट करतानाचे महत्त्वाचे मुद्दे.
जबड्याची वाढ व्यवस्थित झाल्यावर कोणीही डेंटल इम्प्लान्ट करू शकते. १७ वर्षावरील महिला आणि १८ वर्षावरील पुरुष ही ट्रीटमेंट करू शकतात. वयस्करसुद्धा करू शकतात. फक्त जबडा व हाड मजबूत असायला हवे. इतर मेडिकल कंडिशन्स असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा उपचार त्रासदायक नाही. डॉक्टरांसाठी सोपे काम आहे. प्रोसिजरमध्ये थोडं दुखत. फार दुखत नाही. या ट्रीटमेंटच्या दोन उपपद्धती आहेत. तीन महिन्यांची ट्रिटमेंन्ट आणि तीन दिवसांची ट्रीटमेंट. पण डॉक्टर सुचवतात की, तीन महिन्यांचा वेळ जाऊ द्या. ट्रिटमेंट करण्याआधी साध्या सोप्या चाचण्या डॉक्टर करून घेतात.'स्पेसमेंटेनर'च्या मदतीने प्रोसिजर पुढेही ढकलता येते. चांगल्या कॉलिटीचे इंम्प्लांट तीन वर्षही टिकतात. दर सहा महिन्यांनी चेकअप करा. इंम्प्लांटची काळजी तुम्हाला व्यवस्थित घ्यावीच लागते.
डेंटल इम्प्लान्टचे दुष्परिणाम होतात का?
डॉक्टर सांगतात, इंम्प्लांटचे काहीही दुष्परिणाम नाहीत. पण जर काळजी नीट घेतली नाही, तर अनेक त्रास होऊ शकतो. सतत डॉक्टरांना भेटून चेकअप करून घ्या. जर एखाद्या मेडिकल कंडिशनमधून जात असाल, तर डेंटल इम्प्लान्ट केल्याचे डॉक्टरांना सांगा. ही पद्धत फार सोपी आणि चांगली आहे.