Join us

गॅस-कफमुळे वैतागलात? रात्री झोपण्यापूर्वी नाभीत घाला 'हे' तेल, चेहरा होईल ग्लो- बिघडलेलं पचनही सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2025 19:38 IST

Simple trick for glowing face and gut health: Traditional oiling for health and beauty: पोट साफ होत नसेल तर नाभीत तेल घालायला हवे. जाणून घेऊया कोणत्या आजारावर कोणते तेल नाभीत घालायला हवे.

असं म्हटलं जातं की, आपलं संपूर्ण आरोग्य हे आपल्या शरीराच्या आतील अंगावर अवलंबून असते.(Skin Care tips) चेहऱ्यावर सतत पिंपल्स, गॅस, अपचन किंवा बिघडलेले पचन या सगळ्यांचा संबंध येतो ते आपल्या पोटाशी. परंतु, आयुर्वेदानुसार याचा संबंध येतो ते आपल्या नाभीशी.(Bloating issue) नाभी हे आपल्या शरीरातील सगळ्यात चांगले केंद्र मानण्यात आले आहे. आपल्या शरीरातील ७२ हजार नाड्यांना एकत्र जोडण्याचे काम नाभी करते.(Glow skin and fix digestion naturally)  नाभीमध्ये तेल लावण्याचे फायदे देखील अनेक आहेत.(Ayurvedic remedy for gas and skin glow) याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो.(Belly button oiling benefits) आपल्याला पोटाच्या काही समस्या असतील तर नाभीमध्ये तेल घालायला हवे.(Natural remedy for gas and dull skin) कफ, गॅस किंवा अपचनाचा त्रास होत असेल. पोट साफ होत नसेल तर नाभीत तेल घालायला हवे. जाणून घेऊया कोणत्या आजारावर कोणते तेल नाभीत घालायला हवे. 

केस विरळ होऊन टक्कल पडण्यापूर्वी रोज खा ‘ही’ चटणी, केस होतील मोठे- दाट -जाडजूड

1. पोटाच्या संबंधित काही त्रास असेल पोट फुगणे, गॅस किंवा बद्धकोष्ठता तर नाभीमध्ये एरंडेल तेल लावणे फायदेशीर आहे. हे तेल नैसर्गिकरित्या पचनक्रिया सुधारते.तसेच आतड्यांची हालचाल सुधारते. 

2. हार्मोनल संतुलित ठेवण्यासाठी नाभीमध्ये तिळाचे तेल घालायला हवे. महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी हे सर्वात फायदेशीर मानले जाते. 

3. चेहऱ्यावर मुरुमे-पिंपल्स असल्यास नाभीत कडुलिंबाचे तेल घाला. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल, तसेच मुरुमांची समस्या कमी होईल. 

4. आपली त्वचा खूप कोरडी आणि निस्तेज दिसत असेल तर नाभीत खोबऱ्याचे तेल घाला. हे तेल त्वचा मॉइश्चयरायझ करण्यास मदत करते. बदामाचे तेल त्वचा चमकदार आणि मऊ करण्यास मदत करते. सांधे दुखीचा त्रास होत असेल मोहरीचे तेल नाभीत घाला. 

 

नाभीत तेल कसे लावायचे?

रात्री झोपण्यापूर्वी नाभीत २ ते ३ थेंब तेल घाला. हलक्या हातांनी गोलाकार पद्धतीने मालिश करा. सकाळी उठल्यानंतर पोट हलके होईल तसेच गॅस-कफच्या समस्येपासून सुटका होईल.   

टॅग्स : आरोग्य