Join us
Daily Top 2 Weekly Top 5

भल्या सकाळची ‘ही’ १ चूक ठरते ९० % वेळा हार्ट ॲटॅकचं कारण, डॉक्टरांचा सल्ला एकच पत्थ्य पाळा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:13 IST

Heart Attack Cause : एका डॉक्टरांच्या मते, 90 टक्के हार्ट अ‍ॅटॅक सकाळच्या एका चुकीच्या सवयीमुळे येतात. आणि महत्वाची बाब म्हणजे ही सवय खाण्याशी किंवा तणावाशी संबंधित नाही.

Heart Attack Cause : यूकेमध्ये दर तीन मिनिटांत एका व्यक्तीचा हृदयरोगामुळे मृत्यू होतो. ब्रिटिश हार्ट फाउंडेशननुसार, कोरोनरी हार्ट डिजीज हा जगभरात पुरूष आणि महिलांमध्ये मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. केवळ यूकेमध्येच यामुळे दररोज सुमारे 480 मृत्यू होतात, म्हणजेच वर्षाला 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांचा जीव जातो. हार्ट अ‍ॅटॅकचं हे सर्वात सामान्य कारण आहे. एका डॉक्टरांच्या मते, 90 टक्के हार्ट अ‍ॅटॅक सकाळच्या एका चुकीच्या सवयीमुळे येतात. आणि महत्वाची बाब म्हणजे ही सवय खाण्याशी किंवा तणावाशी संबंधित नाही.

टिकटॉकवर 42 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या डॉ. सना सदोक्साई यांनी अलीकडेच एक व्हिडीओ शेअर करून सांगितले की, आपलं सकाळचं रूटीन हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढवू शकतं. त्या म्हणतात की, “खरा धोका तुम्ही झोपेतून उठल्यानंतर सुरू होतो, जेव्हा तुम्ही हालचाल न करता तसेच पडून राहता.”

त्या म्हणाल्या, “बहुतेक लोक बेडवरून उठताच मोबाईल पाहतात, मग बसून राहतात आणि नंतर घाईघाईत घराबाहेर पडतात. यामुळे शरीर कमी हालचालींच्या आणि जास्त सुस्तीच्या स्थितीत राहतं.”

त्यांच्या मते ही सवय हळूच पण गंभीर परिणाम करते, जसे की, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढणे, पोटावर चरबी साचणे, हाय ब्लड प्रेशर, शरीरात इन्फ्लमेशन वाढणे, मेटाबॉलिज्झमध्ये बिघाड या सगळ्यामुळे लवकर हार्ट अ‍ॅटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, खासकरून तुम्ही ओव्हरवेट किंवा लठ्ठ असाल तर.

डॉ. सना पुढे सांगतात, “सकाळी फक्त 5 ते 7 मिनिटं हालचाल जसं की वेगानं चालणं, स्ट्रेचिंग किंवा श्वसनाचे व्यायाम केल्यास ब्लड सर्कुलेशन सुधारतं, मेटाबॉलिझम अ‍ॅक्टिव्ह होतं, रक्तातील शुगर कंट्रोल राहते आणि हृदयाचं संरक्षण होतं. तुमचं वजन, मेटाबॉलिझम आणि हृदय यांचा खूप खोलवर संबंध आहे. सकाळच्या या सवयीकडे दुर्लक्ष केल्यास जीवाला मोठा धोका होऊ शकतो. अशात ही सवय बदलणं म्हणजे जीव वाचवण्यासारखं आहे.”

त्या शेवटी इशारा देतात की, जर आपल्याला लठ्ठपणा, पोटावर चरबी, धाप लागणे, डायबिटीस, सतत थकवा अशा समस्या जाणवत असतील, तर त्या मेटाबॉलिक वॉर्निंग साईन्स आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Morning inactivity linked to 90% heart attacks, says doctor

Web Summary : Doctor warns that lying still after waking up, especially checking phones, increases heart attack risk. Simple morning activity like walking or stretching improves circulation and protects the heart. Ignoring this habit can be life-threatening, especially for overweight individuals.
टॅग्स : हृदयविकाराचा झटका