Join us

महिलांनो!! दातांकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला आणि तुमच्या बाळालाही त्रास होतो.. ऐका किती भयंकर परिणाम होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 16:23 IST

Neglecting your teeth can harm you and your baby too.. Listen to the consequences : दातांची काळजी घेणे फारच गरजेचे असते. जाणून घ्या.

भारतात डेंटल हेल्थला फार महत्त्व दिलं जात नाही. पण ओरल काळजी घेणं खूप गरजेचे आहे. याबाबत माहिती देताना ऑर्थोस्क्वेअरच्या फाऊंडर अॅण्ड सीईओ डॉ. रिद्धी राठी शेठ यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. फारच कमी लोकांना हे माहिती असतात.(Neglecting your teeth can harm you and your baby too.. Listen to the terrible consequences.)

'बजाज फिनान्स', ‘सेव्हइन’, 'शॉप से' यासारख्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी दंतचिकित्सा करणाऱ्या ऑर्थोस्क्वेअर क्लिनिक्स यांच्यासोबत करार केला असून त्याद्वारे आता ‘केअर नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच आधी तपासणी, उपचार करून घ्या आणि नंतर उपचारांचे पैसे भरा अशी सवलत ग्राहकांना मिळते आहे. ऑर्थोस्क्वेअर अंतर्गत देशभरात १०० पेक्षा जास्त डेंटल क्लिनिक आहेत. त्या क्लिनिकमधील हजारो रुग्णांना आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांमार्फत झीरो कॉस्ट इएमआय देऊ करण्यात आला आहे.

गर्भधारणेचा, मेनोपॉजचा महिलांच्या दातांवर काही परिणाम होतो का? 

गर्भधारणेत हिरड्यांना सुज येऊ शकते. त्याला तूप लावा. जर तुम्हाला काही डेंटल प्रॉब्लेम असतील तर त्या रक्तातून तुमच्या पोटातील बाळापर्यंत जातात. (Neglecting your teeth can harm you and your baby too.. Listen to the terrible consequences.)त्यामुळे बाळाला दातांच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी दातांकडे दुर्लक्ष करू नये. वेळोवेळी काळजी घ्या. आयवीएफ ट्रिटमेंट घेण्याचा विचार करत असाल तर, पेरिओडोंटायटीस या जीवाणूचा संसर्ग तोंडात होतो. त्याचे प्रमाण खूप झाले तरी बाळ होताना त्रास होतो. गरोदर महिलांना उलट्या होतात. त्यामुळे पोटातील अॅसिड तोंडात येते. दातांचे आजार होतात. त्यामुळे दातांची काळजी घ्या. स्तनपानाच्या काळात दातांची हाडे कमी होऊ शकतात. त्यामुळे चांगले कॅल्शियमचे पदार्थ खा. मेनोपॉजमध्येही कॅल्शियम कमी होतात. जीवनसत्त्व डी शरीरातील वाढवा. त्यानुसार आहार घ्या.

लहान मुलांना दात येताना काय त्रास होतात? 

आजकाल शुद्ध दूध मिळणे फार कठीण आहे. रात्री झोपताना मुलांना दूध पाजले जाते. अशा दुधामुळे मुलांच्या दातांवर एक थर तयार होतो. बाळांचे दात ओल्या फडक्याने साफ करा. मगच त्यांना झोपवा. दुधाचे दात पडणारच आहेत, म्हणून पालक दुर्लक्ष करतात. पण तसे केल्याने त्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो.

लहान मुलांचे दात चॉकलेटमुळे खरंच किडतात का? 

चॉकलेटमधील कोको पावडरमुळे नाही तर, साखरेमुळे दात किडतात. चॉकलेटपेक्षा बिस्किट, वेफर्स यांच्यामुळे दात जास्त किडतात. मुलांना डार्क चॉकलेट खायला द्या. चॉकलेट खाऊन झाल्यावर सफरचंद खा. दात घासायची सवय मुलांना लावा. ब्रेसेस लावण्यासाठी ७व्या वर्षापासूनचे वय योग्य आहे. तारुण्यापेक्षा हे वय जास्त चांगले आहे.

अंगठा चोखल्याने दात पुढे येतात का? वयाच्या ३ऱ्या वर्षापर्यंत मुलांनी अंगठा चोखणं नैसर्गिक आहे. त्यात काही चूक नाही. पण ४थ्या वर्षीपासून दातांवर आणि टाळूवर परिणाम व्हायला लागतो. दात पुढे येतात. खालचा ओठ आत जातो.

लहान मुलांच्या दुधाच्या दातांकडे दुर्लक्ष करू नका. तसेच महिलांनी दातांची काळजी घ्या. पाळी, गर्भधारणा, मेनोपॉज सगळ्याचाच दातांवर परिणाम होतो.  

टॅग्स : दातांची काळजीमहिलाआरोग्यप्रेग्नंसी