वयोमानानुसार, गुडघेदुखीचा त्रास होणं हे सामान्य आहे, परंतु सध्या ऐन तारुण्यात देखील हा त्रास बऱ्याचजणांनां सतावतो. गुडघेदुखीची समस्या सुरुवातीला फारच साधीसुधी (Natural ways to reduce knee pain) वाटत असली तरी, वेळीच लक्ष न दिल्यास हा त्रास अजून वाढू शकतो. अनेकजण (Remedies for joint sound in knees) गुडघेदुखीकडे दुर्लक्ष करुन वेळ मारुन नेतात परंतु असे केल्याने पुढे ही वेदना सतत (Knee pain home remedies) राहते आणि चालताना, जिने चढताना किंवा बसताना त्रासदायक ठरते. विशेषतः गुडघ्यातून येणारा 'कटकट' आवाज हा अनेकदा दुर्लक्षित केला जातो, पण हा सांधांच्या आरोग्याविषयी एक महत्त्वाचा इशारा असू शकतो(Knee pain treatment at home naturally).
वय वाढल्यामुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे हाडांमधील ग्रीसिंग कमी होऊन, सांधे झिजू लागतात आणि त्यामुळे गुडघ्यातून आवाज येऊ लागतो. गुडघेदुखीमुळे सांध्यांतून वारंवार आवाज येत असेल, तर तो इशारा आहे की काहीतरी बिनसतंय. सुरुवातीला हा त्रास किरकोळ वाटतो, पण वेळेत लक्ष दिलं नाही तर गुडघेदुखी आयुष्यभर छळू शकते. कायरोप्रॅक्टर डॉ. हरीश ग्रोवर यांनी त्याच्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये गुडघेदुखीची समस्या कमी करण्यासाठी कोणते ५ घरगुती उपाय करण्यास सांगितले ते पाहूयात. डॉक्टरांनी सांगितलेले उपाय केल्यास गुडघ्यांतून येणाऱ्या आवाजात आणि सांध्यांच्या वेदनेपासून नक्कीच आराम मिळू शकतो.
१. गुडघेदुखी असताना सांध्यांतून येणारा आवाज कमी करण्यासाठी घरगुती उपाय...
१. गुडघ्यांतून "कट-कट" आवाज येण्यामागे अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता. शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं की हाडं आणि सांधे कमकुवत होऊ लागतात आणि त्याचा थेट परिणाम गुडघ्यांवर होतो. तिळाचे लाडू आणि नाचणीची भाकरी यांचा आहारात समावेश केल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघते.
२. गुडघ्यांमध्ये सूज असल्यामुळे जर आवाज येत असेल, तर आलं - लसूणचा वापर फायदेशीर ठरतो. यासाठी आहारात आलं - लसूण यांचा समावेश जरुर करावा, यामुळे आराम मिळतो.
आईबाबांसह घरात वडिलधाऱ्यांना असेल डायबिटिस तर मुलांना लावा ४ सवयी, मुलांचा लठ्ठपणा धोकादायक...
३. जिने चढताना किंवा उतरताना त्रास होतोय तर आहारात मूग डाळ आणि अखरोट खाणं सुरू करा. हे स्नायूंना बळकटी देण्याचे मुख्य काम करतात.
४. गुडघ्यांच्या कॅटिलेजची समस्या असेल तर अशावेळी आहारात सोयाबीन आणि ओट्स यांचा समावेश करावा. हे कॅटिलेजचं संरक्षण करण्यास मदत करतात.
५. डॉक्टरांच्या मते, दररोज २० मिनिटं उलटं (Reverse Walking) चालल्यास गुडघ्यांतील कटकट आवाज कमी होतो आणि सांध्यांची लवचिकता वाढते. हा उपाय सातत्याने ४ आठवडे केल्यास चांगला फरक जाणवतो.
२. गुडघेदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय...
१. हळदीमध्ये नैसर्गिक अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळदीचं गरम दूध प्यायल्याने गुडघ्यांची सूज आणि वेदना दोन्ही कमी होतात. हे दूध वेदनांना मुळापासून कमी करण्यास मदत करतं.
२. हळद गरम तेलात मिसळून त्याचा लेप गुडघ्यांवर लावावा, यामुळे गुडघेदुखी कमी होण्यास मदत मिळते. हळदीमधील औषधी गुणधर्म वेदना आणि सूज दोन्ही दूर करण्यात मदत करतात.
मिठाच्या पाण्यानं चेहरा धुवा-बघा तुमच्या चेहऱ्यावरचं वाढणारं तेज! चवीपुरतं मीठ बदलून टाकेल रुप...
३. मोहरीच्या तेलात लसूणाच्या ४ ते ५ पाकळ्या घालून तेल उकळवा. हे तेल थोडं कोमट करून गुडघ्यांवर मालिश करा. हा उपाय सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
४. गुडघ्यांवर गरम किंवा थंड पाण्याचा शेक दिल्याने आराम मिळतो. गरम पाण्याची पिशवी गुडघ्यावर ठेवल्यास रक्ताभिसरण सुधारते. थंड पाण्याने शेकल्यास सूज आणि जळजळ कमी होते.