Join us

National Nutrition Week 2025 special : दही ताक खा आणि तब्येत ठेवा ठणठणीत, पोषणाचा खजिना तुमच्या घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2025 08:05 IST

National Nutrition Week 2025 special : लेख २ : विकतचे नाही घरचे दही ताक रोज खा, आणि भरपूर जगा आनंदाने!

शितल मोगल (आहार तज्ज्ञ आणि वर्कआउट प्लॅनर)

दही  हा भारतीय आहार  एक महत्त्वाचा घटक आहे दही हे "पचनासाठी अमृत आहे. हा एक  natural fermentation प्रकार आहे. (National Nutrition Week 2025) यात प्रोटीन कॅल्शियम फॉस्फरस विटामिन C मुबलक प्रमाणात असते.(Health benefits of curd) विटामिन B 12 चा उत्तम नॅचरल स्त्रोत. त्वचेच्या कांतीसाठी दही उत्तम व केसांसाठी दह्याचा लेप हा अतिशय उत्तम असतो भूक कमी करण्यास व वजन नियंत्रण करण्यास दही मदत करते.(Benefits of buttermilk) यातील कॅल्शियममुळे हाडे व दात मजबूत होतात विशेष करून लहान मुलांसाठी. याच्या सेवनाने चांगले कोलेस्ट्रॉल HDL वाढते. (Nutrition week special tips)

दही लावल्यानंतर बारा तासांच्या आत खाल्ल्याने त्यातील चांगले बॅक्टेरिया पोटाचे कार्य सुधारतात व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.रात्री दही खाणे टाळावे, थंड प्रकृती असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात दही खाल्ल्याने सर्दी खोकला होऊ शकतो.दह्याचा वापर आहारात सातत्याने केल्याने मेंदूतील सकारात्मकता वाढवणाऱ्या पेशींमधील रासायनिक प्रक्रिया वाढीस लागून चिंता नकारात्मक विचार आणि अवदासिन्य कमी होऊन मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे. योग्य प्रमाणात व योग्य वेळी दही सेवन केल्याने शरीर सुदृढ राहते तसेच मन प्रसन्न  राहते.

ताक का प्यावे?

ताकाचा नियमित सेवन करणारा मनुष्य रोग व्याधींपासून दूर राहतो.ताकामुळे शरीरातील उष्णता ऍसिडिटी कमी होते ताक आतड्यातील व्याधींवर अतिशय उपयुक्त असते, ताज्या दह्याच्या ताकात हिंग जिरे व सैंधव घालून प्यालयाने मूळव्याध व ओटीपोटीचे दुखणे दूर होते.  ताकात  lactic acid असल्याने पचन संस्थेच्या क्रियांवर ते लाभदायक असते यातील प्रोटीन व लोह व व्हिटामिन C मुबलक प्रमाणात असते. दोन ते तीन चमचे दही घेऊन त्यात एक ग्लास पाणी घालून केलेल्या पातळ ताकाने संपूर्ण शरीराचे आरोग्य व पोटाचे आरोग्य सुधारते. ताक शक्यतो दुपारी जेवणानंतर नंतर एक तासांनी घ्यावे.

 संपर्क :शीतल मोगल 8605243534  

टॅग्स : आरोग्य