Join us

ऑफिसात एकाच जागी बसून मान, पाठ, कंबर आखडली? नॅपकिनचा १ भन्नाट उपाय - दुखणं गायब, मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2025 17:10 IST

Muscle pain & stiffness home treatment : simple home remedy for body pain : how to relax tight muscles naturally : natural way to relieve stress & body pain : मान, पाठ, कंबरदुखी किंवा स्नायूंवरील ताण कमी करुन आराम मिळवण्यासाठी घरीच कोणता उपाय करायचा ते पाहा...

सध्याच्या बिझी आणि धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये, ऑफिस असो वा घर आपल्यावर कामाचा ताण आणि जबाबदाऱ्यांचा भार खूप वाढला आहे. इतकेच नाही तर, ऑफिसमध्ये डेस्कवर सतत एकाच जागी बसून राहण्यामुळे होणारे शारीरिक व मानसिक त्रास हे देखील आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरतात. घरकाम, ऑफिस, कामासाठी केलेला प्रवास यांसारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकदा आपल्याला शारीरिक त्रास भोगावा लागतो. काहीवेळा हा त्रास वाढला तर मान, पाठ, कंबरदुखी, स्नायूंमध्ये वेदना - जखडलेपणा, ताण हळूहळू वाढू लागतो. मान, पाठ, कंबरदुखी एकदा का मागे लागली की तीव्र वेदना आणि स्नायू आखडल्याची समस्या सतावू लागते(natural way to relieve stress & body pain).

सततचा कामाचा ताण, चुकीची बसण्याची पद्धत आणि शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे स्नायूंवर ताण येतो आणि वेदना वाढतात.अनेकदा या वेदना कमी करण्यासाठी आपण लगेच पेनकिलर किंवा इतर केमिकलयुक्त औषधांचा आधार घेतो, ज्यामुळे तात्पुरता आराम मिळतो, पण त्याचे दीर्घकाळात दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. परंतु हा त्रास कमी करण्यासाठी, आपल्या घरातच एक अतिशय सहजसोपा, नैसर्गिक आणि घरगुती उपाय उपलब्ध आहे, जो वेदना कमी करून स्नायूंना आराम देतो आणि शरीरातील आखडलेपण दूर करतो. मान, पाठ, कंबरदुखी किंवा स्नायूंवरील ताण कमी करुन आराम मिळवण्यासाठी घरीच (Muscle pain & stiffness home treatment) कोणता उपाय करायचा ते पाहूयात... 

मान, पाठ, कंबरदुखी किंवा स्नायूंवरील ताण कमी करण्यासाठी घरगुती उपाय... 

मान, पाठ, कंबरदुखी किंवा स्नायूंवरील ताण कमी करण्यासाठीचा हा घरगुती उपाय chefjaspreet.singh या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सततच्या धावपळीमुळे शरीराचे दुखणे, ताण कमी करण्यासाठी घरगुती उपाय करताना आपल्याला २ ग्लास गरम पाणी, १ छोटा नॅपकिन, २ टेबलस्पून मीठ आणि चमचाभर विक्स इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

दिवसभरातील ५ सवयी नकळत वाढवतात तुमचा स्ट्रेस! आरोग्याचं वाटोळं होण्यापूर्वी करा ‘एवढाच’ बदल...

नेमका उपाय काय आहे ? 

हा घरगुती उपाय करण्यासाठी सर्वातआधी, एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. पाणी गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मंद आचेवर करून त्यात नॅपकिन टॉवेल संपूर्णपणे भिजेल असे ठेवावं. मग या नॅपकिनवर चमचाभर मीठ घालावे. त्यानंतर चिमट्याच्या मदतीने नॅपकिन पाण्यांत उलट - सुलट करुन हलकेच गरम करुन घ्यावे. २ ते ३ मिनिटे नॅपकिन पाण्यांत भिजवून गरम झाल्यावर एका मोठ्या परातीत काढून घ्यावे. 

लघवीला उग्र दुर्गंधी येते ? दुर्लक्ष करू नका, लघवीतील 'या' बदलांकडे दुर्लक्ष केल्यास पडू शकते महागात... 

 

परातीत नॅपकिन काढून घेतल्यावर ते हलकेच थंड करुन घ्यावे, त्यातील जास्तीची वाफ काढून घ्यावी. मग थोडेसे विक्स घेऊन ते नॅपकिनवर सर्वत्र व्यवस्थित पसरवून लावावे. मग हे नॅपकिन, शरीराचा जो भाग दुखत आहे किंवा मान, पाठ कंबरेवर ठेवून गरम पाण्याच्या वाफेने शेक देऊ शकता. असे किमान २ ते ३ वेळा करावे यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील दुखणे कमी होण्यास मदत मिळते. पाण्याच्या गरम वाफेमुळे स्नायूंवरील अतिरिक्त ताण आणि आखडलेपणा कमी होतो. आपण घरच्याघरीच अशा प्रकारे स्नायूंच्या दुखण्यावर आणि स्ट्रेसवर इन्स्टंट उपाय करु शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Napkin trick relieves office pain: Simple home remedy for relief.

Web Summary : Constant sitting causes body pain. A simple home remedy using a hot napkin with salt and Vicks provides relief from muscle stiffness and pain in the neck, back, and waist. This natural treatment reduces stress and muscle tension effectively.
टॅग्स : आरोग्यआरोग्य बजेट २०१८होम रेमेडीलाइफस्टाइल