Join us   

गौरी-गणपतीमध्ये जास्तीचं खाणं झालं? पोटाला त्रास होऊ नये म्हणून आहारात घ्या 3 हलके पदार्थ…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 4:39 PM

Light and easy Recipes for good digestion in festive season : पचायला हलका आहार घेतल्यास पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

गौरी-गणपती म्हटलं की घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ, भरपूर पाहुणे आणि त्यानिमित्ताने खाल्ले जाणारे जास्तीचे पदार्थ. या काळात तळकट, गोड, मसालेदार असे सगळेच जास्तीचे खाणे होते. तसेच या काळात पावसाळी हवा असल्याने खाल्लेले अन्न नीट पचतेच असे नाही. त्यामुळे पोटाला या सगळ्याचा त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी एकावेळी जास्त खाणे झाले तर दुसऱ्या वेळी किंवा दुसऱ्या दिवशी आवर्जून हलका आहार घ्यायला हवा. आता हलका आहार म्हणजे नेमके काय? तर पचायला आणि पोटाला हलका पडेल असा आहार घ्यायला हवा (Light and easy Recipes for good digestion in festive season). 

(Image : Google)

१. दहीभात किंवा खिचडी

दहीभात किंवा मूगाच्या डाळीची खिचडी पचायला अतिशय हलकी असते. त्यामुळे जड जेवण झाले असेल तर रात्रीच्या वेळी किंवा नाश्त्यालाही दहीभात किंवा मूगाची खिचडी खाणे केव्हाही जास्त चांगले. 

२. सॅलेड 

सॅलेडमध्ये मोठ्या प्रमााणात फायबर्स असतात तसेच सॅलेड पचायलाही हलके असते त्यामुळे काकडी, टोमॅटो, कोबी, गाजर, बीट अशाप्रकारचे सॅलेड खायला हवे. ते पोटभरीचे होते, एनर्जी मिळते आणि त्यामुळे पोटालाही आराम मिळू शकतो. 

(Image : Google)

३. आंबोळी किंवा डाळींचा डोसा

आंबोळी किंवा मूगाच्या आणि इतर डाळी भिजवून त्याचा डोसा केला तर तो पचायला हलका होतो. हे गरमागरम डोसे चटणी, सॉस किंवा दही यांच्यासोबत अतिशय चांगले लागतात. डाळी असल्याने यातून मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळते त्यामुळे शरीराचे पोषण होण्यासही मदत होते. त्यामुळे आंबोळी किंवा डाळींचा, तांदळाच्या पीठाचा डोसा हा हलका आहार म्हणून उत्तम पर्याय आहे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नगणेशोत्सव