उन्हाळा सुरु झाला की, अंगाची लाहीलाही होते. कडक ऊन, घामामुळे येणारा थकवा आणि सतत लागणारी तहान यामुळे आपले शरीर लवकर डिहायड्रेट होते.(Lemon water benefits) अशा वेळी आपण फ्रीजमधील थंडगार पाणी किंवा बाजारात मिळणारी थंड पेय पिण्याकडे वळतो. पण या पेयांमुळे तात्पुरता तहान भागवली जाते. शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करत नाहीत. यात असणारी साखर शरीरासाठी अधिक हानिकारक असते. म्हणून उन्हाळ्यात नैसर्गिक पेय पिणं महत्त्वाचे आहे. (Amla juice benefits)
जेव्हा नैसर्गिक पेयांचा विचार येतो तेव्हा आपल्यासमोर दोन पर्याय असतात. लिंबू पाणी आणि आवळा ज्यूस. लिंबू पाणी हे उन्हाळ्यात नेहमीच प्यायले जाते. तर आवळा हे सूपरफूड मानले जाते.(Summer drinks) यामुध्ये आयुर्वेदानुसार उष्णता कमी करणारे घटक आहेत. यात दोघांमध्ये असणारे घटक व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. जे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. पण आरोग्यासाठी लिंबू पाणी की, आवळा ज्यूस काय आहे फायदेशीर पाहूया. (Reduce body heat naturally)
लिंबू पाणी हे शरीराला लगेच ऊर्जा देते. घामामुळे आपल्या शरीरातील क्षार बाहेर पडते. जे लिंबू पाणी प्यायल्याने भरुन निघते. जेवणानंतर लिंबू पाणी प्यायल्याने अपचन आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. यातील व्हिटॅमिन सी त्वचेला हायड्रेट ठेवते आणि उन्हामुळे आलेला काळपटपणा देखील कमी करते.
आवळ्याला आयुर्वेदात अमृतफळ म्हटलं जातं. आवळा प्रकृतीसाठी थंड असतो. लिंबू पाणीच्या तुलनेत आवळा शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतो. एका आवळ्यामध्ये साधारण २० लिंबांइतके व्हिटॅमिन सी असते. हे शरीराची झीज भरून काढण्यास मदत करते. आवळा ज्यूस रक्तातील विषारी घटक बाहेर काढतो, ज्यामुळे उन्हाळ्यात येणारी घामोळी किंवा पुरळ कमी होतात.
उन्हातून आल्यानंतर डिहायड्रेशनची समस्या होत असेल तर लिंबू पाणी उत्तम आहे. यामध्ये थोडे काळे मीठ आणि जिरे पावडर टाकल्यास ते पचनासाठी बेस्ट ठरते. जर आपल्याला पित्ताचा त्रास होत असेल, डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा शरीरात खूप उष्णता जाणवत असेल, तर आवळ्याचा रस अधिक गुणकारी ठरतो. आवळा ज्यूस हा नैसर्गिक कूलंट म्हणून काम करतो जो लिंबापेक्षा जास्त काळ शरीराला थंडावा देतो.
