Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डायबिटीस असणाऱ्यासाठी कलिंगड 'अमृत' की 'विष'? दिवसभरात किती-कोणत्या वेळी खावं, शुगर न वाढता घ्या फळांचा आनंद

डायबिटीस असणाऱ्यासाठी कलिंगड 'अमृत' की 'विष'? दिवसभरात किती-कोणत्या वेळी खावं, शुगर न वाढता घ्या फळांचा आनंद

Diabetes madhe kalingad khave ka: Managing blood sugar while eating summer fruits: पाहूयात डायबिटीस असणाऱ्यांनी दिवसभरात किती वेळा आणि कोणत्या वेळी कलिंगड खायला हवं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2026 12:38 IST2026-04-05T12:37:02+5:302026-04-05T12:38:43+5:30

Diabetes madhe kalingad khave ka: Managing blood sugar while eating summer fruits: पाहूयात डायबिटीस असणाऱ्यांनी दिवसभरात किती वेळा आणि कोणत्या वेळी कलिंगड खायला हवं.

Is watermelon safe for diabetic patients Best time to eat watermelon for sugar patients How much watermelon can a diabetic eat per day Fruits to avoid in diabetes Marathi | डायबिटीस असणाऱ्यासाठी कलिंगड 'अमृत' की 'विष'? दिवसभरात किती-कोणत्या वेळी खावं, शुगर न वाढता घ्या फळांचा आनंद

डायबिटीस असणाऱ्यासाठी कलिंगड 'अमृत' की 'विष'? दिवसभरात किती-कोणत्या वेळी खावं, शुगर न वाढता घ्या फळांचा आनंद

उन्हाळा सुरु झाला की बाजारात आपल्याला लालचुटूक, रसाळ कलिंगड पाहायला मिळतं. शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी कलिंगड हे सगळ्यात चांगलं फळ मानले जाते. पण डायबिटीसचा प्रश्न असतो, तेव्हा मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात.(Diabetes madhe kalingad khave ka) कलिंगड चवीला गोड असल्यामुळे ते खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढेल का? हा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. अनेकजण भीतीमुळे हे फळ खात नाही, तर काही जण अतिप्रमाणात खाऊन रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवून घेतात. (Managing blood sugar while eating summer fruits)
खरंतर डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी फळे मोजक्या प्रमाणात आणि योग्य वेळी खाणं महत्त्वाचं असते. कलिंगडमध्ये ९५ टक्के पाणी आणि फायबर असते. जे आरोग्यासाठी चांगलं आहे.(Watermelon nutrition facts for diabetes) पण याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने ते खाताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाच आहे. पाहूयात डायबिटीस असणाऱ्यांनी दिवसभरात किती वेळा आणि कोणत्या वेळी कलिंगड खायला हवं. 

मेनोपॉज म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात! महिलांनी चाळिशीत विसरूच नयेत ५ गोल्डन रुल्स, राहाल कायम आनंदी आणि फिट

मधुमेह असलेल्या व्यक्तीने फळ खाताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि ग्लायसेमिक लोड (GL). कलिंगडाचा GI ७२ च्या आसपास आहे जो जास्त मानला जातो, पण त्याचा GL कमी आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले, तर ते सुरक्षित असू शकते.

डॉक्टरांच्या मते डायबिटीसच्या रुग्णाने एका वेळी १०० ते १५० ग्रॅम कलिंगड खाणे चांगले असते. कलिंगड कापून त्याचे छोटे तुकडे करुन खा. प्रमाणापेक्षा जास्त कलिंगड खाल्ल्यास रक्तातील साखर वेगाने वाढते. कलिंगड खाण्याची योग्य वेळ ही सकाळची असते. रात्रीच्या वेळी कलिंगड खाऊ नका, यावेळी शरीराची हालचाल कमी असते, ज्यामुळे साखर रक्तामध्ये लवकर साठू शकते. यामुळे सतत लघवीला येते. 

कलिंगड नुसते खाण्याऐवजी ते प्रोटिन किंवा गुड फॅट्स सोबत खा. कलिंगडसोबत थोडे बदाम, अक्रोड किंवा अळशीच्या बिया खा. प्रोटिन आणि फॅट्समुळे कलिंगडमधील नैसर्गिक साखरेचे पचन हळू होते. ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही. 

कलिंगडचा ज्यूस प्यायल्याने त्यातील फायबर नष्ट होतात आणि साखर थेट रक्तात मिसळते. त्याऐवजी कलिंगडाचे तुकडे चावून खावेत. ज्यामुळे शरीराला फायबर मिळेल आणि पोटही भरलेले राहिल. ज्यांची 'फास्टिंग शुगर' नेहमी वाढलेली असते किंवा ज्यांना किडनीचा त्रास आहे, त्यांनी कलिंगड खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा डायटिशियनचा सल्ला नक्की घ्यावा.
 

Web Title : डायबिटीज में तरबूज: अमृत या विष? कितनी मात्रा में और कब खाएं?

Web Summary : डायबिटीज रोगियों के लिए तरबूज सीमित मात्रा में ही खाएं। 100-150 ग्राम तक सुबह के समय लेना बेहतर है। चीनी के अवशोषण को धीमा करने के लिए नट्स या बीज के साथ लें। जूस से बचें; फाइबर के लिए टुकड़े खाएं। यदि शुगर ज़्यादा है तो डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Watermelon for Diabetics: Friend or Foe? How Much & When?

Web Summary : For diabetics, watermelon can be enjoyed in moderation. Limit intake to 100-150 grams, preferably in the morning. Pair with nuts or seeds to slow sugar absorption. Avoid juice; eat pieces for fiber. Consult your doctor if fasting sugar is high.