Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दात नीट घासले तरी दातांवर पिवळा थर येतो? घरच्याघरी खास टूथपावडर, अमेरिकन तज्ज्ञ सांगतात उपाय

दात नीट घासले तरी दातांवर पिवळा थर येतो? घरच्याघरी खास टूथपावडर, अमेरिकन तज्ज्ञ सांगतात उपाय

How to whiten your teeth naturally : दातांचा पिवळेपणा फक्त दात घासून निघणार नाही..त्यासाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 03:31 PM2024-07-10T15:31:55+5:302024-07-10T15:33:00+5:30

How to whiten your teeth naturally : दातांचा पिवळेपणा फक्त दात घासून निघणार नाही..त्यासाठी..

How to whiten your teeth naturally | दात नीट घासले तरी दातांवर पिवळा थर येतो? घरच्याघरी खास टूथपावडर, अमेरिकन तज्ज्ञ सांगतात उपाय

दात नीट घासले तरी दातांवर पिवळा थर येतो? घरच्याघरी खास टूथपावडर, अमेरिकन तज्ज्ञ सांगतात उपाय

दात पिवळे होणे ही एक सामान्य समस्या आहे. पिवळे दात फक्त सौंदर्यावर बाधा आणत नाही तर, दात आणि हिरड्याच्या संबंधित अनेक आरोग्य समस्यांनाही आमंत्रित करतात. दोन वेळा दात घासूनही अनेकदा दात स्वच्छ होत नाहीत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तोंडाची स्वच्छता न ठेवल्यामुळेही दातांवर पिवळा थर जमा होतो, यालाच टार्टर म्हणतात. टार्टरमुळे दात आणि हिरड्या कमकुवत होतात. ज्यामुळे दातांमधून रक्त आणि हिरड्या दुखणे ही समस्या निर्माण होते(How to whiten your teeth naturally).

जर दात घासून दातांवरचा पिवळा थर निघत नसेल तर, प्लेकचं रुपांतर टार्टरमध्ये होऊ शकतो. जे दातांच्या आणि हिरड्यांच्या मुळांमध्ये प्रवेश करू शकतात. यामुळे श्वासाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दातांच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात. याबाबत अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर आणि लेखक डॉ. जोसेफ मर्कोला यांनी टूथपेस्टऐवजी टूथपावडर वापरण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे दात स्वच्छ होतील.

दात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय

दातांवरचा पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

दात स्वच्छ करण्यासाठी आपण टूथपेस्ट आणि ब्रशने दात घासतो. जर टूथपेस्टनेही दात स्वच्छ होत नसतील तर, आपण घरात टूथपेस्ट पावडर तयार करू शकता. यामुळे डेण्टिस्टकडे न जाता दात स्वच्छ होतील.

रेस्टॉरंटस्टाइल नूडल्स ते ही प्रेशर कुकरमध्ये? २ शिट्ट्यांमध्ये - अगदी १० मिनिटात चमचमीत नूडल्स रेडी

घरगुती टूथपेस्ट पावडर करण्यासाठी लागणारं साहित्य

- खोबरेल तेल

- बेकिंग सोडा

- पेपरमिंट तेलाचे काही थेंब

- चिमुटभर हिमालयीन मीठ

बनवण्याची पद्धत

एका भांड्यात खोबरेल तेल, बेकिंग सोडा, मीठ आणि पेपरमिंट तेल घेऊन सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा. तयार मिश्रण सकाळी किंवा सायंकाळी दातांवर लावून घासा. यामुळे दात चमकतील. आपण या पेस्टचा वापर दररोज करू शकता. यामुळे दात स्वच्छ होतील.

प्लेग टाळण्यासाठी इतर उपाय

- दिवसातून दोनदा किमान दोन मिनिटे फ्लोराईड टूथपेस्टने दात घासावे. यामुळे दातांवर साचलेली घाण निघेल आणि दात स्वच्छ होतील.

अमिताभ बच्चन पाहा रोज कसा करतात व्यायाम, त्यांचे ट्रेनर सांगतात-शिस्त आम्हाला त्यांनी शिकवली कारण..

- जिथे टूथब्रश पोहचत नाही. तिथे आपण फ्लॉसिंगद्वारे दातांमधील घाण काढू शकता. यामुळे अन्नाचे कण निघतील आणि दात स्वच्छ होतील.

- मिठाई आणि स्टार्चयुक्त पदार्थ खाल्ल्याने तोंडात बॅक्टेरिया आणि प्लेक तयार होते.

- जेवल्यानंतर नेहमी गुळण्या करा. चहा, कॉफी, तंबाखूचे सेवन कमी करा. 

Web Title: How to whiten your teeth naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.