Join us
Daily Top 2 Weekly Top 5

स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळे थकले, नजर अंधूक? रोज फक्त १० मिनिटे करा ही ५ योगासने- चष्म्याचा नंबर होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2026 17:00 IST

eye strain from screen: blurry vision remedy: yoga for eyes: चष्म्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी कोणती ५ योगासने करावीत, पाहूया.

सध्याच्या धावपळीच्या युगात आपला सगळ्यात जास्त वेळ हा स्क्रीनसमोर जातो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.(eye strain from screen) ऑफिसचे काम असो किंवा करमणूक, तासनतास स्क्रीनकडे एकटक पाहिल्यामुळे आपल्या डोळ्यांवर प्रचंड ताण येतो.(blurry vision remedy) यामुळे कमी वयातच डोळे थकणे, जळजळ होणे, पाणी येणे आणि दृष्टी धुरकट होणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. आजकाल तर अगदी लहान मुलांच्या डोळ्यांवरही जाड भिंगाचे चष्मे दिसू लागले आहेत.(yoga for eyes) अनेकांना वाटते की एकदा चष्मा लागला की तो आयुष्यभर घालावा लागतो. परंतु, आपण रोज फक्त १० मिनिटे डोळ्यांसाठी काही योगासने केली, तर रक्ताभिसरण सुधारून डोळ्यांचा थकवा दूर होतो आणि दृष्टी पुन्हा तेज होऊ शकते. चष्म्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी कोणती ५ योगासने करावीत, पाहूया. 

पपई चिरण्याची भन्नाट युक्ती, १ स्टिलचा डबा-१ सुरी एवढं फक्त घ्या- बघा झटपट काम

1. तळवे चोळणे ही सगळ्यात सोपी आणि आरामदायी क्रिया आहे. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर जोरात घासा. जोपर्यंत त्यात उष्णता निर्माण होत नाही. यानंतर डोळे मिटून हातांचे कोमट तळवे डोळ्यांवर ठेवा. हाताची उष्णता डोळ्यांना थंड करण्यास मदत करते, ज्यामुळे थकवा दूर होतो. 

2. एका अंधाऱ्या खोलीत मेणबत्ती किंवा दिव्याची ज्योत डोळ्यांच्या समोर ठेवा. पापणी न बंद करता एकटक पाहा. जेव्हा डोळ्यातून पाणी येईल, तेव्हा डोळे मिटून घ्या. यामुळे एकाग्रता वाढते. 

3. डोळ्यांचे व्यायाम करा. ताठ बसा आणि मान न हलवता फक्त डोळ्यांच्या बाहुल्या हलवा. सगळ्यात आधी डोळे वर खाली करा. नंतर डावीकडे आणि उजवीकडे फिरवा. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंची लवचिकता वाढते. 

4. भ्रामरी प्राणायाम करा. सुखासनात बसून अंगठ्याने कान बंद करा आणि तर्जनी कपाळावर व उरलेली बोटे डोळ्यांवर ठेवा. दीर्घ श्वास घेऊन ॐ म्हणा. या कंपनामुळे डोळ्यांच्या नसांना आराम मिळतो. तसेच मानसिक थकवा देखील कमी होईल. 

5. अनुलोम-विलोम प्राणायाम. हा प्राणायाम आपल्या शरीरातील नाड्या शुद्ध करण्याचे काम करतो. एका नाकपुडीतून श्वास घेणे आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडणे, यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. डोळ्यांना नसांना पुरेसे ऑक्सिजन मिळाल्यावर दृष्टी सुधारण्यास मदत होईल.   

English
हिंदी सारांश
Web Title : Tired Eyes from Screen Time? Try These Yoga Poses!

Web Summary : Excessive screen time strains eyes. These five yoga poses, done daily for ten minutes, can improve blood circulation, reduce eye fatigue, and potentially reduce your glasses prescription. Simple exercises like palming, candle gazing, eye movements, and pranayama techniques offer relief and improve vision.
टॅग्स : आरोग्यडोळ्यांची निगा