Join us   

स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे कसे ओळखाल? विशीनंतर स्तनाची काळजी घेण्यासाठी ४ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2023 2:07 PM

Tips for Breast Cancer स्तनाच्या कर्करोगाचे निदान सुरुवातीलाच झाले, तर त्यावर उपचार करणे शक्य आहे.

जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या केसेस झपाट्याने वाढत आहे. खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे हा आजार वाढत चालला आहे. निष्काळजीपणा आणि आजाराची लक्षणे वेळेवर न तपासणे हे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडेही जात आहे. कॅन्सरची काही प्रकरणे अनुवांशिक असतात. अशावेळी याच्यापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, ब्रेस्ट कॅन्सची लक्षणे जाणून त्याच्यावर त्वरित निदान करणे आवश्यक आहे. 

मेयो क्लिनिकच्या मते, "त्वचेच्या कर्करोगानंतर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्यपणे निदान झालेला कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो. परंतु, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हा रोग झपाट्याने वाढत आहे".

नियमित चाचणी करा

चाळीशी नंतर बहुतांश स्त्रियांना विविध आजार उद्भवतात. ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा देखील समावेश आहे. त्यामुळे दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सर संबंधित जागरूकता आणि चाचणी करण्यासाठी महिलांना सांगितले जाते. 

स्तनांची तपासणी करा

वयाच्या विशीनंतर प्रत्येक स्त्रियांनी आपल्या स्तनाची नियमित तपासणी केली पाहिजे. यासह तुमच्या स्तनांचे स्वरूप परिचित होण्यास व कोणत्याही बदलांबद्दल अधिक सतर्क राहण्यास मदत करेल.

डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरूकता आणि लक्षणे प्रत्येक स्त्रीला माहिती असणे गरजेचं आहे. दर तीन वर्षांनी, डॉक्टरांकडून स्तनाची तपासणी करून घ्या. क्लिनिकल स्तन तपासणीद्वारे गाठी शोधल्या जाऊ शकतात. त्यामूळे स्तनाची काळजी घेणं आवश्यक.

जीवनशैलीचे घटक

जीवनशैलीचे घटक स्तनाच्या कर्करोगावरही परिणाम करतात. उदाहरणार्थ, जे लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम गरजेचं आहे.

टॅग्स : स्तनाचा कर्करोगआरोग्यहेल्थ टिप्सस्तनांची काळजी