कमी वयातच गुडघेदुखीचा त्रास अनेकांना सतावू लागला आहे. आधी वयाची चाळीशी- पन्नाशीनंतर गुडघेदुखी-सांधेदुधीचा त्रास सुरु व्हायचा.(Winter joint pain remedy) पण आता मात्र तरुण मंडळीही गुडघे दुखत आहे अशी तक्रार करतात. हिवाळा सुरु झाला की हा त्रास आणखी वाढतो.(Ayurvedic paste for knee pain) गुडघे दुखणे, कंबर दुखणे, हातांची बोटे कडक झाली अशा कुरबुरी सतत वाढतात. सतत एकाच जागी बसून काम केल्याने आपल्याला या समस्येचा सामना करावा लागतो. (Winter knee pain treatment) अनेकदा चालताना किंवा उठताना गुडघ्यामधून आवाज येतो. कंबरदुखीमुळे पाठीच्या मणक्यावर दाब येतो. त्यामुळे उठताना आणि बसताना देखील त्रास होतो.(Home remedy for joint pain) इतकेच नाही अचानक हाताची बोटे दुखणे, सांधे दुखीचा त्रास वाढतो. कमी वयात गुडघेदुखीचा त्रास वाढला तर आपण काही औषधे खातो पण याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. (Ayurveda for arthritis pain)
अनेकदा चुकीचा आहार, चुकीचा व्यायाम आणि लठ्ठपणा या समस्येमुळे देखील गुडघेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. चालताना-फिरताना त्रास होतो. अशावेळी आपण आयुर्वेदिक लेप लावल्यास गुडघेदुखीचा त्रास कमी होईल. हा लेप कसा बनवायचा पाहूया. (Herbal paste to relieve knee pain and improve flexibility)
सावळ्या रंगाच्या मुलींसाठी परफेक्ट लिपस्टिक शेड्स, ५ पर्याय- ओठ दिसतील सुंदर, लूकही येईल खुलून
तेल बनवण्यासाठी आपल्याला १ चमचा एरंडेल तेल, अर्धा चमचा मध, चिमूटभर दालचिनी पावडर आणि सुपारी लागेल. सगळ्यात आधी आपल्याला लहान वाटी घेऊन त्यात चमचाभर एरंडेल तेल घालावे लागेल त्यानंतर मध, दालचिनी पावडर, चुना, सुपारी पावडर घालून त्याची पेस्ट तयार कराल. या पेस्टमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हा लेप आपण रात्री झोपण्यापूर्वी गुडघ्यांना लावायला हवा. त्यानंतर मऊ कापडाने किंवा पट्टीने झाकून रात्रभर ठेवा. सकाळी कोमट पाण्याने धुवा.
नियमितपणे हा उपाय केल्यास शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. तसेच सांधेदुखीचा आणि गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. ७ ते १० दिवस नियमित वापरल्याने वेदना, कडकपणा आणि जडपणा कमी होतो.
