Join us

मधाने दात घासा आणि नंतर 'हा' उपाय करा! पिवळे पडलेले दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2025 15:44 IST

How To Get Rid Of Yellow Teeth: दात पिवळे पडले असतील तर हा एक उपाय नक्कीच करून पाहा..(how to reduce yellow colour on teeth?)

ठळक मुद्दे मध उष्ण असल्याने तो दातांवरचा पिवळा थर कमी करण्यास मदत करतो.

रोजच्यारोज नियमितपणे ब्रश करूनही काही जणांचे दात पिवळे असतात. काही जण तर दिवसातून दोन वेळा ब्रश करतात. पण तरीही त्यांच्या दातांचा पिवळेपणा जात नाही. बरेच लोक असेही आहेत जे दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी जोर लावून ब्रश करतात. पण यामुळे दात पिवळ्याचे पांढरे तर होत नाहीतच, उलट दातांवरचा संरक्षणात्मक थर कमी होऊन दात सेंसिटीव्ह व्हायला लागतात. अशा दातांनी मग थंड- गरम खाताना प्रचंड वेदना होतात (how to reduce yellow colour on teeth?). म्हणूनच आता हा एक सोपा उपाय पाहा (use of honey for teeth). हा उपाय केल्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होण्यास नक्कीच मदत होईल असं तज्ज्ञ सांगत आहेत.(best home hacks for teeth whitening)

 

दात पांढरेशुभ्र होण्यासाठी मधाचा वापर

पिवळसर झालेले दात स्वच्छ करण्यासाठी तसेच दात छान मजबूत होण्यासाठी काय उपाय करता येईल, याविषयीची माहिती डॉक्टरांनी drharishpatankar या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

रात्रीच्या जेवणात ५ चुका कराल तर वजन- शुगर दाेन्हीही वाढेल! रक्तातली साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी...

यामध्ये डॉक्टर सांगत आहेत की तुम्ही जर कोणतेही टुथपेस्ट वापरण्याऐवजी मध वापरून दात स्वच्छ केले तर दात छान पांढरेशुभ्र होण्यास मदत होते. मध उष्ण असल्याने तो दातांवरचा पिवळा थर कमी करण्यास मदत करतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.

 

यासाेबतच जुन्या काळी हळद आणि मीठ यांचा वापर करून दात स्वच्छ केले जायचे. दात चमकविण्यासाठी हा उपायही अतिशय चांगला आहे, असं डॉक्टर सांगतात. 

दिवसभर काम करून मान- पाठ आखडते? फक्त ५ मिनिटांचं 'हे' काम करा- चटकन आराम मिळेल

याशिवाय दातांनाही तेलाची गरज असते. त्यामुळे ऑईल पुलिंगही काही दिवसांतून एकदा निमयितपणे केले पाहिजे. मधाने दात स्वच्छ करण्यासोबतच ऑईल पुलिंगही केले तर दोन्हींचा चांगला परिणाम होऊन पिवळे पडलेले दात  नक्कीच पांढरेशुभ्र होऊन चमकण्यास मदत होऊ शकते. काही वेळा हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. 

 

टॅग्स : ब्यूटी टिप्सआरोग्यस्वच्छता टिप्स