Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हिवाळ्याच्या दिवसांत सांधेदुखी, अंगदुखी वाढली? 'या' पद्धतीने शेका दुखरी जागा- काही मिनिटांत बरं वाटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2025 18:12 IST

Health Tips: हिवाळ्याच्या दिवसांत सांधेदुखी डोकं वर काढू लागते. हा त्रास कमी करण्यासाठी पुढे सांगितलेला एक खास उपाय करून पाहा..(how to get instant relief from joint pain in winter?)

ठळक मुद्दे या दिवसांत तुमचे गुडघे, पाठ, कंबर किंवा शरीरातले कोणतेही स्नायू दुखत असतील तर हा उपाय नक्कीच उपयोगी ठरू शकताे.

हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की जुनाट दुखणी डोकं वर काढू लागतात असं म्हणतात. या दिवसांत सर्दी, अस्थमा, दमा असे त्रासही उफाळून येतात आणि त्याचप्रमाणे हाडांची जुनी दुखणी, संधीवात असे त्रासही होऊ लागतात. शिवाय या दिवसांत सुर्यप्रकाशात फारसे जाणे होत नाही, त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते आणि त्याचाही परिणाम म्हणजे हाडांचे दुखणे वाढते. अशावेळी काय उपाय करावा सुचत नाही. म्हणूनच हा एक पर्याय पाहा. जर या दिवसांत तुमचे गुडघे, पाठ, कंबर किंवा शरीरातले कोणतेही स्नायू दुखत असतील तर हा उपाय नक्कीच उपयोगी ठरू शकताे.(how to get instant relief from joint pain in winter?)

 

हिवाळ्यात सांधेदुखी, अंगदुखीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी कोणता उपाय करता येऊ शकतो याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ pallavii.khadee या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

चेहऱ्यावर शिंपडा लवंगचं जादुई पाणी, हळूहळू त्वचेचं सौंदर्य खुलून चेहरा दिसेल फ्रेश, ग्लोईंग..

हा उपाय करण्यासाठी ५ ते ६ चमचे ओवा, ५ ते ६ चमचे सैंधव मीठ, ८ ते १० लवंग, एक ते दिड इंच आले, २ चमचे हळद, १५ ते २० कडुलिंबाची पाने असं साहित्य लागणार आहे.

 

हे सगळं साहित्य एका सुती कपड्यामध्ये गुंंडाळा आणि त्याची पोटली तयार करा. यानंतर ही पोटली एखाद्या गरम तव्यावर ठेवून तापवून घ्या आणि नंतर ती तुमच्या शरीराच्या दुखऱ्या भागावर ठेवा. अशा पद्धतीने हळूहळू शेक देऊन दुखरी जागा शेकून काढा.

नव्या नवरीसाठी लेटेस्ट फॅशनचं मंगळसूत्र घ्यायचंय? ८ सुंदर डिझाईन्स- कमी वजनात घ्या ठसठशीत डिझाईन्स..

शेक देताना दुखऱ्या जागेवर खूप जोर देऊ नये. शिवाय हा उपाय करूनही दुखणं थांबतच नसेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. दुखणं अंगावर काढू नये. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Relieve winter joint pain with this simple homemade heat pack remedy.

Web Summary : Ease winter joint and body pain with a homemade heat pack. Combine carom seeds, rock salt, cloves, ginger, turmeric, and neem leaves in a cloth. Warm it on a pan and gently apply to affected areas for relief. Consult a doctor if pain persists.
टॅग्स : आरोग्यथंडीत त्वचेची काळजीहोम रेमेडी