Join us
Daily Top 2 Weekly Top 5

डोळे मिटले तरी झोप लागत नाही- रात्रभर कुस बदलता? ५ टिप्स, गाढ-शांत झोप येईल, दिवसभर फ्रेश राहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2026 12:50 IST

How to stop overthinking at night: Best nighttime routine for better sleep: जर आपल्यालाही रात्री शांत झोप हवी असेल आणि सकाळी फ्रेश उठायचे असेल, तर काही साधे पण खात्रीशीर घरगुती बदल नक्कीच मदत करू शकतात.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि सततच्या मानसिक तणावामुळे शांत झोप लागत नाही. दिवसभर ऑफिसचे काम, घराची ओढाताण आणि सतत हातात असलेला मोबाईल यामुळे शरीर थकलेले असूनही डोळ्यांना झोप लागत नाही.(Best sleeping tips) तासनतास अंथरुणावर पडून राहणे, विचारांचे चक्र सुरू राहणे किंवा मध्येच झोप मोड होणे ही आता घराघरातील समस्या बनली आहे. झोप पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी थकवा जाणवणे, कामात लक्ष न लागणे आणि चिडचिडेपणा वाढणे असे अनेक त्रास उद्भवतात. (5 minutes Deep sleep tips) झोप येण्यासाठी गोळ्या घेणे हा कधीही कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही, उलट त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. अशा वेळी आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून चालत आलेले पारंपारिक घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या केवळ आरोग्यासाठीच नाही, तर मनाला शांत करून गाढ झोप मिळवून देण्यासाठी जादूई काम करतात.(Morning freshness and sleep connection) जर आपल्यालाही रात्री शांत झोप हवी असेल आणि सकाळी फ्रेश उठायचे असेल, तर काही साधे पण खात्रीशीर घरगुती बदल नक्कीच मदत करू शकतात. जर आपणही अशाच समस्येचा सामना करत असाल, तर काही टिप्स लक्षात ठेवल्या तर आपल्याला शांत झोप लागेल.  

२५० रुपयांत खरेदी करा शॉर्ट कुर्ती, जीन्स-पलाझोवर सुंदर दिसतील ५ लेटेस्ट पॅटर्न, उन्हाळ्यात गरमही होणार नाही

1. रात्री झोपण्यापूर्वी एक कप कोमट दूध पिणे हा जुना उपाय आहे. दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे घटक असते जे झोप येण्यास मदत करते. त्यात चिमूटभर जायफळ पूड टाकल्यास शांत झोप लागते. कारण जायफळ हे नैसर्गिकरीत्या मन शांत करणारे औषध मानले जाते.

2. झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर काशाच्या वाटीने किंवा हाताने तळपायांना गायीचे तूप किंवा तिळाचे तेल लावून ५ ते १० मिनिटे मसाज करा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि थकवा दूर होऊन खूप लवकर गाढ झोप लागते. 

3. जर आपल्याला रात्री चहा-कॉफी पिण्याची सवय असेल, तर ती बदलून कॅमोमाइल टी घ्या. यात कॅफिन नसते आणि हे कॅफिन नसते आणि हे स्नायूंना शिथिल करते. तसेच अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्यास मानसिक ताण कमी होऊन झोपेची गुणवत्ता सुधारते. 

4. झोपण्याच्या अर्ध्या तास आधी घरातील लाईट बंद करुन मंद प्रकाशात राहा. यामुळे डोळ्यांना आणि मेंदूला विश्रांती मिळण्याचे संकेत मिळतात. तसेच, अंथरुणावर पडल्यावर दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा, ज्यामुळे नाडी संस्था शांत होते. 

5. झोपण्यापूर्वी किमान ३० ते ६० मिनिटे मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉपपासून दूर राहा. या उपकरणातून निघणारा निळा प्रकाश आपली झोप उडवतो. त्याऐवजी पुस्तक वाचा किंवा गाणी ऐका. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sleepless nights? 5 tips for sound sleep and a fresh morning.

Web Summary : Struggling with sleeplessness? Try these traditional home remedies for a peaceful night. Drink warm milk, massage your feet, and avoid screens before bed. These simple changes can improve sleep quality and leave you feeling refreshed.
टॅग्स : आरोग्यहोम रेमेडी