Join us   

ब्रा साइज कसा मोजायचा? सुयोग्य मापाची ब्रा निवडण्यासाठी 8 टिप्स, आरोग्याचा विचार महत्वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 12:07 PM

आपल्या ब्राचा साइज माहित असणे किंवा नसणे, तो योग्य पद्धतीने मोजणे आणि त्याच मापाची ब्रा खरेदी करुन घालणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्यावर पुरेशी चर्चा होताना दिसत नाही...

ठळक मुद्दे ब्रा साइज माहित असणे आणि त्याप्रमाणे खरेदी करणे गरजेचे आहेब्रा साइज योग्य नसेल तर आरोग्यालाही त्याचा त्रास होऊ शकतोब्रा साइज कशी मोजायची हे जाणून घेऊया...

वयात आल्यापासून आपण नियमित ब्रेसियर घालतो, ही ब्रेसियर कम्फर्टेबल असणे गरजेचे असते. पण त्याची साइज आपल्याला नीटशी माहित नसते असे आपल्याला कोणी म्हटले तर आपल्याला खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे, आपल्यापैकी अनेकींना आपल्या ब्रेसियरचा, ब्रेस्टचा साइज नीट माहित नसतो. तो कसा मोजायचा याबाबतही पुरेशी माहिती नसते. त्यामुळे आपण ब्रेसियरचा रंग, कापड याकडे पाहतो पण त्याचा साइजच व्यवस्थित नसला तर आपल्या स्तनांचा आकार विचित्र दिसतो आणि कालांतराने आपल्याला आरोग्याच्याही काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. 

ब्रेसियरची साइज चुकीची असेल आणि त्यावर आपण कितीही छान कपडे घातले तरी ते अव्यवस्थित दिसते. किंवा अनेकदा चुकीच्या साइजमुळे आपली चरबी ब्रेसियरमधून बाहेर आल्यासारखी वाटते. तर कधी खूप घट्ट झाल्याने आपण अनकम्फर्टेबल होतो. त्यामुळे याबाबत वेळीच पुरेशी माहिती करुन घेणे गरजेचे आहे. आता हा ब्रा साइज कसा ओळखायचा, कप साइज म्हणजे काय, बँड साइज म्हणजे काय हे सगळे समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे दुकानात ब्रेसियर आणायला जाताना ही किमान तयारी करुन गेल्यास तुमची खरेदी काही प्रमाणात तरी सोपी होईल आणि तुम्हाला कम्फर्टेबल तर वाटेलच पण ब्रेसियर व्यवस्थित बसली की नकळत अकप्रकारचा आत्मविश्वास आल्यासारखे वाटेल. 

( Image : Google)

१. ब्रेसियरची खालची पट्टी ज्याठिकाणी येते म्हणजे ब्रेस्टच्या खालचे माप मेजरींग टेपने मोजून घ्या. हा आपल्या ब्रेसियरचा मुख्य साइज असतो. यालाच बॅंड साइज असे म्हणतात. हा साइज व्यवस्थित असेल तर तुम्हाला ब्रेसियर नीट बसते.

२. यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या ब्रेस्टचा कप साइज माहित असायला हवा. कप साइज म्हणजे निप्पलच्या टोकापासून छातीचा गोल साइज असतो. हा साइजही आपण घरी मेजर करुन घ्यायला हवा. 

३. हे माप घ्यायला मेजरिंग टेप योग्य पद्धतीने पकडणे गरजेचे आहे. हे माप खूप घट्ट आणि खूप अंतर ठेऊन घेऊ नये. त्यामुळे ब्रेसियरचे माप चुकू शकते. 

४. ब्रेस्टचे माप घेताना तुमच्या अंगावर ब्रेसियर आणि इतर कपडे नकोत. हे माप आपल्याला माहित नसेल तर दुकानातही हे माप घेतले जाते. मात्र अंगावर कपडे असल्याने त्यांनी घेतलेले हे माप चुकते आणि वेगळ्याच साइजची ब्रेसियर खरेदी केली जाते.

( Image : Google)

५. कप साइज हा कायम जास्त असतो, बँड साइज म्हणजेच कंबरेचा साइज किंवा पट्टीचा साइज त्यापेक्षा कमी असतो. जास्त आकड्यातून कमी आकडा वजा केल्यावर जितके उरतात तो आपला कप साइज असतो हे वेळीच लक्षात घ्या. हे A,B,C,D यामध्ये मोजले जाते. त्यामुळे तुमची वजाबाकी होऊन ४ आकडा आला तर कप साइज D असतो. वजाबाकी २ आली तर कप साइज B असतो. 

६. कप साइज कमी घेतला तर अनेकदा ब्रेसियर घालूनही आपले फॅट्स विचित्र पद्धतीने ब्रेसियरमधून बाहेर आलेले दिसतात. ही चरबी काखेच्या बाजुनी तर कधी मध्यभागी वर आल्यासारखी दिसते. तर काही वेळा ही चरबी पाठीच्या बाजूला सरकल्यासारखी दिसते. त्यामुळे कप साइज योग्य घेणे अतिशय गरजेचे आहे. 

७. बँड साइज खूप घट्ट असेल तर छातीच्या खालच्या बाजूला काचते आणि वळ उठतात. अशावेळी कधी एकदा ब्रेसियर काढून टाकतो असे आपल्याला होते. असे जास्त काचले तर त्याठिकाणी खाज येते, काळे डाग पडायला सुरुवात होते. आणि कित्येकदा श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो. 

८. अशाप्रकारे तुम्हाला ब्रेसियरचा नेमका साइज माहित असेल तर तुम्ही रेडिमेड ब्लाऊज, शरारा किंवा ज्या ड्रेसमध्ये ब्रा घालावी लागत नाही असे डिझायनर कपडे अगदी सहज खरेदी करु शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य