Join us

व्हिटामिन 'डी' मिळण्यासाठी सूर्यप्रकाशात नेमके किती वाजता-किती वेळ बसावे? डॉक्टर सांगतात, सोपं काम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2025 16:47 IST

how long should we sit in the sun to get vitamin D : best time to sit in the sun for vitamin D : how to absorb vitamin d from sunlight : सूर्यप्रकाशात किती वेळ व कोणत्या पद्धतीने बसल्यास मिळते पुरेसे व्हिटॅमिन 'डी', पाहा डॉक्टर काय सांगतात...

आपल्या शरीरासाठी अनेक व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते आणि त्यापैकीच एक महत्त्वाचे व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन 'डी'. व्हिटॅमिन 'डी' चा नैसर्गिक आणि सर्वात सोपा पर्याय म्हणजे सूर्यप्रकाश. 'सूर्यप्रकाश' हा व्हिटॅमिन 'डी' चा सर्वात उत्तम स्त्रोत मानला जातो. आपल्या हाडांच्या मजबुतीपासून ते रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत अनेक गोष्टींसाठी व्हिटॅमिन 'डी' ची गरज असते. व्हिटॅमिन 'डी' च्या कमतरतेमुळे थकवा, हाडे आणि स्नायू दुखणे, वारंवार आजारी पडणे अशा (how long should we sit in the sun to get vitamin D) समस्या उद्भवू शकतात. याशिवायही व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता शरीराचे अनेक प्रकारे नुकसान करते. ही कमतरता भरून काढण्यासाठी उन्हात बसण्याचा सल्ला दिला जातो. परंतु व्हिटॅमिन 'डी' मिळवण्यासाठी (best time to sit in the sun for vitamin D) नेमके कधी, किती वेळ आणि कोणत्या प्रकारे सूर्यप्रकाशात बसावे हे अनेकांना माहित नसते. चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने सूर्यप्रकाश घेतल्यास त्याचा योग्य तो फायदा मिळत नाही(how to absorb vitamin d from sunlight).

खरंतरं, सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन 'डी' मिळवण्यासाठी योग्य वेळ, कालावधी आणि सूर्यप्रकाशात बसण्याची पद्धत महत्त्वाची असते. सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन 'डी' मिळवण्यासाठी, अनेकांच्या मनात प्रश्न असतो की यासाठी किती वेळ उन्हात बसावे? किंवा व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारे बसणे सर्वात चांगले आहे? याविषयीची अधिक माहिती डॉक्टर जमाल खान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. 

डॉक्टर काय सांगतात ?

सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन 'डी' मिळवण्यासाठी, कॅन्सर इम्युनोथेरपी विशेषतज्ज्ञ डॉ. जमाल ए. खान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर सांगतात की, 'व्हिटॅमिन डी थेट सूर्यप्रकाशातून नाही, तर सूर्यापासून बाहेर पडणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमधून (UV rays) मिळते. म्हणूनच, योग्य पद्धतीने सूर्यप्रकाश घेणे महत्त्वाचे असते.'

किती वेळ उन्हात बसावे ?

डॉ. खान यांच्या मते, फक्त १५ मिनिटे उन्हात बसणे पुरेसे आहे. यामुळे शरीराला पुरेसे व्हिटॅमिन 'डी' मिळते. १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ उन्हात बसण्याची गरज नाही.

मूग-तूर-हरबरा-कोणती डाळ किती वेळ पाण्यात भिजवून शिजवली तर होत नाही गॅस-पित्ताचा त्रास?

तांब्याच्या भांड्यातलं पाणी ‘या’ समस्येवर गुणकारी, पोषणतज्ज्ञ सांगतात- पाणी पिण्याची योग्य पद्धत...

सूर्यप्रकाशात नेमकं कसं बसावं ?

व्हिटॅमिन 'डी' मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपण सूर्याच्या दिशेला पाठ करून बसणे. या वेळी हलके आणि आरामदायक कपडे घालावेत, जसे की पातळ कुर्ता, जेणेकरून शरीरावर हलका सूर्यप्रकाश सहजपणे पडेल. अशा पद्धतीने बसल्यास यूव्ही किरणे त्वचेवर चांगल्या प्रकारे परिणाम करतात आणि शरीर नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन 'डी' तयार करतं.

सर्वात योग्य वेळ कोणती ?

व्हिटॅमिन 'डी' मिळवण्यासाठी सकाळची वेळ सर्वात चांगली मानली जाते. सकाळचे ऊन सौम्य आणि फायदेशीर असते. या वेळी उन्हात बसल्याने त्वचेला जास्त नुकसान होत नाही आणि व्हिटॅमिन 'डी' देखील चांगल्या प्रकारे मिळते. अशा प्रकारे, या लहान - सहान गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता भरून काढू शकता आणि आपले आरोग्य अधिक चांगले करू शकता.

रोज सकाळी पोट नीट साफ न होण्याला कारणीभूत दिवसभरातल्या ‘या’ ६ चुका, मागे लागतं जन्मभराचं आजारपण...

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स