Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पुरूषांच्या तुलनेत किती वेगळा असतो महिलांमधील हार्ट अटॅक? जाणून घ्या फरक...

पुरूषांच्या तुलनेत किती वेगळा असतो महिलांमधील हार्ट अटॅक? जाणून घ्या फरक...

Men vs Women Heart Attack : पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या संकेतांकडे जास्त दुर्लक्ष केलं जातं. महिलांमध्ये पुरूषांच्या लक्षणं फार हलकी असतात. त्यामुळे ते त्यांना कळत नाहीत आणि मग उपचारास उशीर होतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:53 IST2024-12-17T15:51:59+5:302024-12-17T15:53:00+5:30

Men vs Women Heart Attack : पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या संकेतांकडे जास्त दुर्लक्ष केलं जातं. महिलांमध्ये पुरूषांच्या लक्षणं फार हलकी असतात. त्यामुळे ते त्यांना कळत नाहीत आणि मग उपचारास उशीर होतो.

How different is a heart attack in women compared to men? warning signs and prevention | पुरूषांच्या तुलनेत किती वेगळा असतो महिलांमधील हार्ट अटॅक? जाणून घ्या फरक...

पुरूषांच्या तुलनेत किती वेगळा असतो महिलांमधील हार्ट अटॅक? जाणून घ्या फरक...

Men vs Women Heart Attack : जगभरात पुरूष आणि महिलांच्या मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण हृदयरोग आहे. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या संकेतांकडे जास्त दुर्लक्ष केलं जातं. महिलांमध्ये पुरूषांच्या लक्षणं फार हलकी असतात. त्यामुळे ते त्यांना कळत नाहीत आणि मग उपचारास उशीर होतो.

एक्सपर्ट्सनुसार, महिला आणि पुरूषांमध्ये हृदयरोगाचं कॉमन लक्षण छातीत वेदना किंवा अस्वस्थता असतं. पण अनेक महिलांमध्ये लक्षण वेगळंही बघायला मिळतं. अशात जाणून घेऊ की, पुरूष आणि महिलांमध्ये हार्ट अटॅकचे मुख्य फरक...

महिलांना हार्ट अटॅकचा धोका कमी असतो का?

हेल्थ एक्सपर्टनुसार, महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं सरासरी वय पुरूषांच्या तुलनेत १० वर्षांनंतर असतं. तरीही त्यांचा मृत्यूदर कमी नाही. WHO च्या २०१० मधील एका रिपोर्टनुसार, महिलांमध्ये मृत्यूचं सगळ्यात कॉमन कारण कोरोनरी हार्ट डिजीज असतं. 65 वयानंतर त्यांच्यात हार्ट अटॅक आणि इतर हार्ट डिजीजचा धोकाही पुरूषांप्रमाणेच असतो. महिलांमध्ये हार्ट अटॅक पुरूषांच्या तुलनेत साधारण दुप्पट वेगाने जीवघेणा असतो.

मेनोपॉजच्या आधी आणि नंतर हार्ट डिजीजवर प्रभाव

मेनोपॉजमुळे वजन वाढतं, पोटावर चरबी जमा होते, डायबिटीस, हाय कोलेस्ट्रॉलचा धोकाही वाढतो. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. वेळेआधीच मेनोपॉज हार्ट अटॅक आणि हार्ट फेलिअरचा धोका वाढवतं. 

कोणत्या कारणाने हार्ट अटॅकचा धोका?

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे ब्लड क्लॉट, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढवतात. याचा सगळ्यात जास्त धोका अशा महिलांमध्ये होतो, ज्या धुम्रपान करतात. ज्यांचं ब्लड प्रेशर हाय आणि हाय कोलेस्ट्रॉल असतं. अशा महिलांना जास्त काळजी घेण्याची गरज असते. 

महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं

महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं थोडी वेगळी असतात. ज्यामुळे ती लगेच ओळखता येत नाही. त्यांच्या छातीत जोरात वेदना होण्याऐवजी श्वास घेण्यास समस्या, जबडा आणि खांद्यामध्ये वेदना, मळमळ, उलटी, बेशुद्ध पडणे, चक्कर येणे आणि सुस्ती यांसारख्या समस्या होऊ शकतात. अशात नियमितपणे टेस्ट कराव्या.

पुरुष-महिलांच्या हार्ट अटॅकमध्ये मुख्य फरक

- पुरूषांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं सामान्यपमे स्पष्ट असतात. जसे की, छातीत वेदना किंवा दबाव, डाव्या हातात वेदना किंवा झिणझिण्या आणि श्वास घेण्यास समस्या. तर महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षण जास्त अस्पष्ट असू शकतात. जसे की, पाठीत वेदना किंवा दबाव, पोटात वेदना किंवा असहजता आणि श्वास घेण्यास त्रास.

- पुरूषांमध्ये हार्ट अटॅकचं मुख्य कारण हाय बीपी, हाय कोलेस्ट्रॉल, धुम्रपान आणि डायबिटीस असतात. तर महिलांमध्ये हार्ट अटॅकचं मुख्य कारण हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीस आणि लठ्ठपणा असतात.

- पुरूषांमध्ये हार्ट अटॅकची लक्षण सामान्यपणे ३० मिनिट ते २ तास राहतात, तर महिलांमध्ये १ तास ते ४ तासांपर्यंत राहू शकतात.

- पुरूष आणि महिला दोन्हींसाठी हार्ट अटॅकनंतर काळजी घेणं फार गरजेचं असतं. अशात नियमितपणे एक्सरसाईज, हेल्दी डाएट आणि तणाव कमी करण्यासाठी योगा केला पाहिजे.

Web Title: How different is a heart attack in women compared to men? warning signs and prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.