सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत सोशल ड्रिंकिंग हा एक ट्रेंड बनला आहे. गेट-टुगेदर असो, ऑफिसची पार्टी, मित्रांसोबत फिरायला जाणं असो, सेलिब्रेशनच्या नावाखाली मद्यपान करण्याचे प्रमाण महिलांमध्येही वेगाने वाढताना पाहायला मिळत आहे.(alcohol and cancer in women) अनेकांना असं वाटतं एखादा पेग किंवा वाईन घेतल्याने काय बिघडणार, शरीरावर असा काय परिणाम होणार? पण जागतिक आरोग्य संघटना आणि अनेक कॅन्सर तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलचे सेवन आणि महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सर यांच्याशी थेट संबंध येतो. (women alcohol health risks)
अल्कोहोलचे प्रमाण शरीरात वाढल्यावर त्याचे रुपातंर अॅसेटाल्डिहाइड नावाच्या विषारी घटकात होते. हा घटक आपल्या शरीरातील पेशींच्या DNA ला हानी पोहोचवतो, ज्यामुळे पेशींची अनियंत्रित वाढ होऊन कॅन्सरचा धोका निर्माण होतो. मद्यपानामुळे शरीरातील 'इस्ट्रोजेन' या हार्मोन्सची पातळी वाढते. इस्ट्रोजेनचे वाढलेले प्रमाण हे ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींना खतपाणी घालण्याचे काम करते.
डाळीला ढाबा स्टाईल तडका देण्याची 'परफेक्ट' पद्धत! २ टिप्स- मसाले जळत नाहीत आणि फोडणी होते झणझणीत
इतकंच नाही तर अनेक महिला अल्कोहोलसोबत सिगारेटचे देखील सेवन करतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक कमकुवत होते आणि कर्करोगाशी लढण्याची क्षमता देखील कमी करते. यामुळे केवळ स्तनाचा कर्करोग नाही तर इतर अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात.
महिलांना बरेचदा असं वाटतं की मर्यादित प्रमाणात अल्कोहोल करणं हानिकारक नाही. पण संशोधनानुसार दिवसाला एक जरी घोट अल्कोहोलचा घेतल्याने महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. आपण जितके जास्त अल्कोहोलचे सेवन करु तितका जास्त धोका वाढत जातो. ज्या महिलांच्या कुटुंबात कॅन्सरचा आजार आनुवांशिक आहे, त्यांच्यासाठी अल्कोहोलचा एक थेंबही आरोग्यासाठी महाग पडू शकतो. अल्कोहोल आणि सिगारेटचे सेवन केल्याने महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.
अल्कोहोलमुळे शरीरातील जीवनसत्त्वांचे शोषण कमी होते. विशेषतः 'फोलेट' कमी झाल्यामुळे शरीराची पेशी दुरुस्त करण्याची क्षमता मंदावते. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता अधिक बळावते. डॉक्टर सांगतात, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मद्यपान आणि धूम्रपान करणं टाळा. याशिवाय संतुलित आहार, व्यायाम, वजन मेटेंन्ड ठेवणं आणि नियमितपणे आरोग्याची तपासणी करणं आवश्यक आहे. तसेच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणंही गरजेचं आहे.
