ऑफिसचे काम, प्रवासाचा ताण आणि सतत जंक फूड, मसालेदार पदार्थ खाल्ले की पोटाच्या तक्रारी अधिक वाढतात. अनेकांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत अपचन, पोट फुगल्यासारखे वाटते. छातीत जळजळ होते अशा अनेक समस्या भेडसावत असतात.(Natural way to treat acid reflux) काहीही थोडे खाल्ले तरी पोट जड होणे किंवा गॅसेसची समस्या सामान्य बनली आहे. (Ayurvedic tips for gastric problems:) जेव्हा आपल्याला असा त्रास होतो तेव्हा आपण मेडिकलमधून एखादी गोळी घेतो. या गोळ्यांमुळे तात्पुरता आराम मिळतो. पण ही औषधे सतत घेतल्याने शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.(Instant relief from gas and bloating) अशावेळी स्वयंपाकघरातील काही पदार्थांचे सेवन केल्यास मिनिटांत गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगण्यापासून सुटका मिळवू शकता.
गुडघ्यांवर काळे डाग- हातपाय काळवंडले? महागड्या क्रीम सोडा, ७ दिवसांत काळेपणा घालवणारा सोपा उपाय
पोटाच्या तक्रारीवर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे ओवा आणि काळे मीठ. ओव्यामध्ये थायमोल नावाचे घटक असते. जे पचनसंस्था सुधारण्यासाठी आणि गॅस बाहेर काढण्यासाठी अत्यंत उपुयक्त ठरतात. यासाठी अर्धा चमचा ओवा हातावर घेऊन त्यात चिमूटभर काळे मीठ मिसळा. हे मिश्रण चावून खा आणि वरुन थोडे कोमट पाणी प्या. ५ मिनिटांत आपल्याला ढेकर येऊन पोट हलके वाटेल. आपण १ ग्लास पाण्यात १ चमचा ओवा उकळून ते पाणी गाळून कोमट असताना प्यायल्याने देखील फायदा होतो.
जर आपले पोट खूप फुगले असेल आणि गॅस पास होत नसेल तर चिमूटभर हिंग कोमट पाण्यात मिसळून नाभीच्या आजूबाजूला लावा. लहान मुलांसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. आल्याचा छोटा तुकडा किसून त्यात लिंबाचा रस आणि थोडे सैंधव मीठ मिसळा. जेवणानंतर हे चाटल्याने अपचनाचा त्रास कायमचा बंद होतो. आले पाचक रसांचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.
जेवणानंतर १ चमचा बडीशेप चाऊन खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो. ज्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत नाही. आपल्याला खूपच त्रास होत असेल तर चिमूटभर हिंग मिसळलेले एक ग्लास कोमट पाणी प्या, यामुळे लगेच आराम मिळेल. हे पाणी पोट फुगण्याचा त्रास कमी करते. हिंगाचे पाणी आम्लपित्त आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम देते. यामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात.
जर आपली पचनक्रिया सतत बिघडत असेल, पोटात गॅस होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच डॉक्टरांकडे जा. आहारदेखील हलका-फुलका असायला हवा. जेवताना खूप पाणी पिऊ नका. जेवणापूर्वी अर्धा तास किंवा जेवणानंतर पाऊण तासाने पाणी पिणे पचनासाठी उत्तम असते.
Web Summary : Suffering from indigestion? Try carom seeds, asafoetida, ginger, or fennel after meals for quick relief from gas, acidity, and bloating. Consult a doctor for persistent issues.
Web Summary : अपच से परेशान हैं? गैस, एसिडिटी और सूजन से तुरंत राहत पाने के लिए भोजन के बाद कैरम के बीज, हींग, अदरक या सौंफ का प्रयोग करें। लगातार समस्या होने पर डॉक्टर से सलाह लें।