Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोट साफ होत नाही, टॉयलेटमध्ये तासन्तास बसून राहावं लागतं ? ३ उपाय- पोट होईल पटकन साफ

पोट साफ होत नाही, टॉयलेटमध्ये तासन्तास बसून राहावं लागतं ? ३ उपाय- पोट होईल पटकन साफ

constipation home remedies: stomach not clean solutions: toilet problem natural cure: आपलंही पोट नीट व्यवस्थित साफ होत नसेल तर ३ सोपे उपाय करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 14:21 IST2025-08-26T14:20:31+5:302025-08-26T14:21:23+5:30

constipation home remedies: stomach not clean solutions: toilet problem natural cure: आपलंही पोट नीट व्यवस्थित साफ होत नसेल तर ३ सोपे उपाय करा.

home remedies for constipation and stomach not clean how to clear stomach instantly at home naturally | पोट साफ होत नाही, टॉयलेटमध्ये तासन्तास बसून राहावं लागतं ? ३ उपाय- पोट होईल पटकन साफ

पोट साफ होत नाही, टॉयलेटमध्ये तासन्तास बसून राहावं लागतं ? ३ उपाय- पोट होईल पटकन साफ

अनेकांना सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं नाही.(Stomach pain) पोट कायम जड वाटतं ज्यामुळे अंगात आळस तर शिरतोच पण अस्वस्थ देखील वाटू लागतं. अनेकांना रोज सकाळी टॉयलेटाला जाताना तासन्तास बसून राहावं लागतं, पण तरीही पोट पूर्णपणे साफ झालं असं वाटत नाही.(constipation home remedies) त्यामुळे दिवसभर थकल्यासारखं होतं, पोटात गडबड जाणवते आणि मूड खराब होतो.(stomach not clean solutions) ही शरीरात बद्धकोष्ठतेमुळे होते.(toilet problem natural cure) सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत ही समस्या अगदी सामान्य झाली आहे.(how to clear stomach quickly) चुकीचा आहार, कमी पाणी पिणे, जास्त मैद्याचे पदार्थ आणि जंकफूडचे सेवन, तासन्तास एकाच जागी बसून राहिल्याने पचनक्रिया मंदावते आणि पोट व्यवस्थित साफ होत नाही. (remedies for constipation relief)

सणावाराला चेहऱ्यावर पिंपल्स आले की चिडचिड होते? १ चमचा साखरेचा करा उपाय-चेहरा दिसेल नितळ स्वच्छ

पोट नीट साफ न झाल्यामुळे पोटदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, चिडचिडेपणा अशा त्रासांनाही सामोरं जावं लागतं. ही समस्या अधिक काळ राहिली की पाईल्स सारखा आजार देखील त्रास देतो. जर आपलेही पोट नीट व्यवस्थित साफ होत नसेल तर ३ सोपे उपाय करा. 

1. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ म्हणतात, आहारातील अनियमितता हे बद्धकोष्ठतेचे मुख्य कारण आहे. जर आपण आहारात काही सुधारणा केली तर पोट साफ होऊ शकते. यासाठी आपल्याला भिजवलेले काळे मनुके खाण्याचा सल्ला दिला आहे. रात्री ४ ते ५ काळे मनुके पाण्यात भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी हे मनुके पाण्यासोबत खा. मनुक्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. याचे सेवन केल्याने शरीरातील फायबर वाढून पचन सुधारते. ज्यामुळे हातड्यांची हालचाल सुरळीत होते. काळ्या मनुक्यांमध्ये सॉर्बिटॉल नावाचे नैसर्गिक संयुग आढळतात. मनुके खाल्ल्याने शरीराला लोह आणि ऊर्जा देखील मिळते. 

2. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात चमचाभर शुद्ध तूप मिसळून प्या. यामुळे आतड्यातील घाण बाहेर पडण्यास मदत करते. जर आपले पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर हा उपाय करुन बघा. लवकर आराम मिळेल. 

3. किवी फळ हे बद्धकोष्ठतेसाठी औषधापेक्षा कमी नाही. दिवसातून १-२ किवी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यात खा. किवीमध्ये असणारे फायबर असते जे पोटातील घाण बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे पचन सुधारते आणि अन्न सहजपणे आतड्यांमध्ये पोहोचवते.


Web Title: home remedies for constipation and stomach not clean how to clear stomach instantly at home naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य