Join us   

Home Cleaning Tips : भांड्यांच्या मांडणीवरचा गंज २ मिनिटात होईल दूर; चकचकीत मांडणीसाठी या घ्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 6:50 PM

Home Cleaning Tips : घराचा कोणताही भाग स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा अतिशय उपयुक्त आहे. त्याच्या एक्सफोलिएटिंग गुणधर्मांचा वापर गोष्टींवरील गंज काढण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

वस्तू ठेवण्यासाठी, काढण्यासाठी स्वयंपाकघरातील मांडणीशी आपला संपर्क येत असतो. स्वयंपाकघरात सर्व प्रकारची भांडी ठेवण्यासाठी मांडणी उपयोगी असते. एकाप्रकारे या स्टँडवर अनेक भांडी सहज ठेवता येतात त्यामुळे जागा कमी लागते. अनेकदा ओलसर भांडी, घाण, धुळीमुळे मांडणीवर गंज लागतो अश्यानं वस्तू लवकर खराब होते. वारंवार पाण्याच्या संपर्कात आल्याने स्टँडमधील गंज इतका घट्ट  होतो की स्वच्छ होता होत नाही. आज या लेखात  तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही मांडणीवरील गंज सहजपणे दूर करू शकता. (Home Cleaning Hacks and Tips)

सँडपेपरचा वापर

मांडणीवरचा गंज सहजपणे काढण्यासाठी तुम्ही सॅंडपेपर वापरू शकता. याच्या वापरानं अगदी हट्टी गंज काही मिनिटांत काढला जाऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम गंज लागलेली जागा एक-दोनदा पूर्णपणे स्वच्छ करावी. यानंतर, गंजलेल्या भागावर पाण्याचे काही थेंब टाका आणि सुमारे 4-5 मिनिटे सॅंडपेपरने घासून घ्या.  एकदा साफसफाई केल्यानं गंज निघत नसल्यास, आपण प्रक्रिया पुन्हा करू शकता. सँडपेपर आजकाल कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात सहज उपलब्ध असतात.

बेकिंग सोडा

घराचा कोणताही भाग स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा अतिशय उपयुक्त आहे. त्याच्या एक्सफोलिएटिंग गुणधर्मांचा वापर गोष्टींवरील गंज काढण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करा. मिश्रण तयार केल्यानंतर ही पेस्ट गंजलेल्या भागावर लावा आणि काही वेळ तशीच राहू द्या. सुमारे 20 मिनिटांनंतर, क्लिनिंग ब्रशने स्वच्छ करा.

लिंबू, चूना, मिठाचा वापर

लिंबाचा रस मीठाच्या क्रिस्टल्सना सक्रिय करतो, ज्यामुळे गंज मऊ होतो आणि सहजपणे काढला जातो. याशिवाय चुना मुळावरील गंज काढण्याचे काम करते. सगळ्यात आधी हे तिन्ही पदार्थ एकत्र करून पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट गंजलेल्या भागावर लावा आणि काही वेळ तशीच राहू द्या. काही वेळाने, क्लिनिंग ब्रश किंवा सॅंडपेपरने घासून स्वच्छ करा.

व्हिनेगर

सॅंडपेपर, बेकिंग सोडा आणि लिंबू, चुना व्यतिरिक्त, आपण मांडणीवरील गंज काढण्यासाठी व्हिनेगर देखील वापरू शकता. पांढर्‍या व्हिनेगरच्या मदतीने गंज सहजपणे काढता येतो. यासाठी प्रथम एक मग पाण्यात दोन ते तीन चमचे व्हिनेगर टाकून स्प्रे तयार करा. आता हे स्प्रे गंजलेल्या भागावर फवारून सुमारे 10 मिनिटे सोडा. 10 मिनिटांनंतर, क्लिनिंग ब्रश किंवा सॅंडपेपरच्या मदतीने ते स्वच्छ करा.

टॅग्स : सुंदर गृहनियोजनस्वच्छता टिप्सहोम रेमेडी