Join us

शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर बोटांवर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा आणि निरोगी रहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 19:30 IST

High Cholesterol Symptoms: महत्वाची बाब म्हणजे शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं की, शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. याचं कारण रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन रक्तप्रवाह थांबलेला असतो.

High Cholesterol Symptoms: कोलेस्टेरॉल वाढणं ही आपल्यासाठी फार गंभीर बाब आहे. कारण कोलेस्टॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, ज्यामुळे रक्तप्रवाह थांबतो किंवा हळूवार होतो. अशात तुम्हाला हृदयरोग, हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा सगळ्यात जास्त धोका असतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करणं फार गरजेचं होऊ बसतं. महत्वाची बाब म्हणजे शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं की, शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. याचं कारण रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन रक्तप्रवाह थांबलेला असतो.

कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणं

हाय फॅट असलेले पदार्थ अधिक खाल्ल्यानं, स्मोकिंग, मद्यसेवन, एक्सरसाइज न करणे आणि जास्त वजन असणे इत्यादींमुळे रक्तात कोलेस्टेरॉल लेव्हल वाढते. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोलेस्टेरॉल लेव्हल वाढल्यावर हात आणि पायांवर काय काय लक्षणं दिसतात आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काय काय करावं.

हात-पायावर दिसणारी लक्षणं 

हाय कोलेस्टेरॉलची समस्या झाल्यावर बोटांवर काही संकेत दिसू लागतात. बोटांमध्ये वेदना होऊ लागतात. जेव्हा हात आणि पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होतं तेव्हा त्यात वेदना जाणवू लागतात.

झिणझिण्या येणं

हात आणि पायांच्या नसांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यावर बोटांमध्ये झिणझिण्या जाणवू लागतात. झिणझिण्या म्हणजे व्यक्तीला त्वचेमध्ये जळजळ, टोचल्यासारखं किंवा सुई टोचल्यासारखं वाटू लागतं. ही डायबिटीसची सुद्धा लक्षण असू शकतात.

बोटं आणि हातावर पिवळेपणा

क्लीवलॅड क्लीनिकच्या एका रिपोर्टनुसार, रक्तात कोलेस्टेरॉल वाढलं तर त्वचा पिवळी दिसू लागते. खासकरून डोळ्यांजवळची त्वचा तर कधी कधी हात आणि तळपायही पिवळे दिसू लागतात. 

बचावासाठी काय करावं

- ट्रान्स फॅट, सॅचुरेटेड फॅट आणि रिफाइंड असलेल्या पदार्थांच्या सेवनाने कोलेस्टेरॉल वेगाने वाढतं, त्यामुळे असे पदार्थ टाळा.

- जर तुम्ही स्मोकिंग किंवा ड्रिंक करत असाल तर ते आजच बंद करा. यामुळे रक्तात वेगाने बॅड कोलेस्टेरॉल तयार होतं.

- जर तुमचं वजन वाढत असेल आणि ते कमी करण्यासाठी तुम्ही काहीच करत नसाल तर तुमच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका अधिक राहतो.

- एक्सरसाइज न करणं कोलेस्टेरॉल वाढण्याचं एक मुख्य कारण आहे. जर तुम्ही कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी करत नसाल तर वेळीच सावध व्हा.

- फार जास्त तणावात राहिल्यानेही कोलेस्टेरॉल वाढतं. स्ट्रेस हार्मोनल वाढल्याने शरीरात कोलेस्टेरॉल तयार होतं.

टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाहेल्थ टिप्स