हल्ली हृदयविकाराचा झटका कोणत्याही वयात येऊ शकतो.(Heart attack issue) सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्याला आरोग्याकडे फारसे लक्ष देता येत नाही.(heart attack symptoms) हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर आपल्याला काही प्रमाणात संकेत देते. ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. (symptoms of heart problems in adults)
शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.(prevent heart attack naturally) लठ्ठपणा हा शरीराच्या बाहेरुन दिसत असला तरी पोटावर, कंबेरवर किंवा चेहऱ्यावर वाढणारे फॅट्स देखील हृदयावर परिणाम करतात.(Heart disease awareness) हृदयाचा आत किंवा त्याच्या आजूबाजूला जमा होणाऱ्या चरबीला व्हिसेरल फॅट म्हणतात. याचा परिणाम आपल्या हृदयावर होतो.
वय पंचविस पण दिसताय चाळिशीच्या, ओपन पोर्समुळे चेहरा खराब? १ सोपी ट्रिक, महिनाभरात दिसेल फरक
डॉ. पियुष मिश्रा यांच्या मते, जेव्हा आपल्या हृदयाभोवती चरबी जमा होऊ लागते. तेव्हा रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. धमन्या कडक होतात आणि हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणून शरीराकडून वेळोवेळी मिळणाऱ्या किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. ही लक्षणे कोणती जाणून घेऊया.
1. आपण जास्त काम न करता वारंवार थकत असला किंवा दिवसभर सुस्त वाटत असेल तर हे फक्त थकवा नसून हृदयाभोवती जमा झालेली चरबीचे लक्षण आहे. यामुळे शरीराचे रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे हृदयाला जास्त प्रमाणात काम करावे लागते. यामुळे लवकर थकवा येतो. अनेकदा आपण याला झोप किंवा ताणव म्हणून दुर्लक्ष करतो. त्यासाठी वेळीच तपासणी करायला हवी.
2. आपल्या हृदयावर चरबी जमा झाल्यास शरीराला योग्यप्रकारे ऑक्सिजन मिळत नाही. ज्याचा परिणाम श्वसनक्रियेवर होतो. थोडेसे चालल्यानंतर किंवा धावल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. ज्यामुळे हृदयाला पूर्ण क्षमतेने काम करण्यास त्रास होतो.
3. कधीकधी हृदयाजवळ साचलेल्या चरबीमुळे छातीत हलकी वेदना किंवा जडपणा जाणवतो. याकडे आपण गॅस किंवा आम्लता समजून दुर्लक्ष करतो. परंतु ही वेदना वारंवार होत असेल तर हृदयविकाराच्या झटक्याचे पूर्व संकेत असू शकतात. जर ही लक्षण खाल्ल्यानंतर किंवा चालताना जाणवत असतील तर सावध रहा. वेळीच योग्य ती तपासणी करा.
रोज खा 'हे' लाल फळ! केसांसाठी जणू संजीवनी, केस इतके दिसतील सुंदर की सगळे विचारतील सिक्रेट
4. हृदयाच्या समस्या या फक्त छातीपुरता मर्यादित नसतात. जेव्हा आपल्या हृदयाभोवती चरबी जमा होऊ लागते तेव्हा त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवर दिसू लागतो. आपल्या डाव्या हातात सतत वेदना होत असतील. मान किंवा जबड्याला त्रास होऊ लागतो. याचे कारण हृदयाला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. अशावेळी डॉक्टरांशी संपर्क साधावा.
5. आपल्याला रात्री वारंवार जाग येत असेल, अस्वस्थ वाटत असेल किंवा झोप सतत उघडत असेल तर हा झोपेचा अभाव नाही. हृदयाजवळ जमा झालेली चरबी श्वसनसंस्थेवर परिणाम करतो. ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. ही समस्या गंभीर आहे.
6. अनेकांची तक्रार असते की जास्त न खाता देखील शरीरातील अतिरिक्त चरबी वाढते. वजन वाढत राहाते. शरीरात वाढणारी अंतर्गत चरबी हळूहळू हृदय आणि यकृतासारख्या महत्त्वाच्या अवयवांजवळ जमा होतात. ज्यामुळे आपली चयापचय मंदावते. यासाठी वैद्यकीय तपासणी महत्त्वाची आहे.