Heart Attack Sign : हृदयरोग किंवा हार्ट अॅटॅकच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. दरवर्षी लाखो लोकांना हार्ट अॅटॅक येतो. अनेक एक्सपर्ट सांगतात की, जसजशी लोकांची लाइफस्टाईल बदलत चालली आहे, हा धोका आणखीही वाढतोय. हल्ली हार्ट अॅटॅक केवळ वृद्ध लोकांना नाही तर तरूणांना देखील येताहेत. हार्ट अॅटॅक म्हटलं की, सामान्यपणे सिनेमांमधील ते सीन आठवतात, ज्यात व्यक्ती छातीतील दुखण्याने तडपत असतो. पण हार्ट अॅटॅक नेहमी तसा नसतो, जसा सिनेमात किंवा मालिकांमध्ये दाखवतात. एक्सपर्ट नेहमीच सांगत असतात की, अनेकदा हार्ट अॅटॅकची लक्षणं इतकी हलकी असतात की, ती सामान्य मानून त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. वरिष्ठ कार्डियोलॉजिस्टने हार्ट अॅटॅकच्या अशाच काही संकेतांबाबत अलर्ट केलं आहे.
काय सांगतात एक्सपर्ट?
कार्डियोलॉजीमध्ये ३० पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असणारे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. इवान लेविन यांनी एका पोस्टमध्ये सांगितलं की, हार्ट अॅटॅकच्या जवळपास ४० टक्के रूग्णांमध्ये छातीत वेदना, दाटलेपणा वेगळा असू शकतो. खासकरून महिला आणि वृद्धांमध्ये हार्ट अॅटॅकदरम्यान फारच वेगळी लक्षणं दिसण्याची शक्यता जास्त बघायला मिळते. काही लोकांमध्ये स्नायूंमध्ये तणाव, हातांमध्ये वेदना बघायला मिळते. ज्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
कुणामध्ये जास्त दिसतात वेगळी लक्षणं?
कार्डियोलॉजिस्ट सांगतात की, महिला आणि वृद्धांमध्ये हार्ट अॅटॅकची अजब लक्षण जास्त दिसतात. हार्ट अॅटॅक अचानक खाली पडणे किंवा बेशुद्ध पडणे, अचानक कन्फ्यूजन किंवा हातात वेदना असाही असू शकतो. महिला याकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता जास्त असते. लोक या लक्षणांना एंझायटी, रिफ्लक्स किंवा स्ट्रेस मानतात.
डॉ. लेविन सांगतात की, आपल्या शरीराचा आवाज ऐका. अचानक विनाकारण होणाऱ्या वेदनेकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. नाभीपासून ते जबड्यापर्यंत शरीरात अचानक वेदना होत असेल, विनाकारण घाम येत असेल तर हार्ट अॅटॅक असू शकतो. ज्या लोकांना आधीच हृदयासंबंधी आजार आहेत, त्यांनी अशाप्रकारच्या संकेतांबाबत सावध राहिलं पाहिजे.
डॉक्टर पुढे म्हणाले की, सामान्यपणे आपल्याला हेच शिकवण्यात आलं आहे की, हार्ट अॅटॅक आला म्हणजे व्यक्ती छाती पकडून खाली पडतो. पण जर आपण प्रत्येकवेळी हार्ट अॅटॅकमध्ये छातीत वेदना होण्याची वाट बघणार असू तर हे जीवघेणं ठरू शकतं.
खूप वेगळी असू शकतात लक्षणं डॉ. लेविन सांगतात की, हार्ट अॅटॅकच्या जवळपास ४० टक्के रूग्णांमध्ये सामान्यपणे ती लक्षणं दिसत नाहीत, जी सिनेमात दाखवली जातात. जेव्हा आपल्या हृदयाच्या स्नायूंमध्ये ऑक्सीजनची कमतरता होते, तेव्हा आपल्याला कन्फ्यूज झाल्यासारखं वाटतं. ऑक्सीजन कमी झाल्याने शरीर सगळीकडे संकेत पाठवत असतं. जबड्यात वेदना होतात. हात दुखायला लागतात. काही केसेसमध्ये अचानक फ्लू किंवा थकवा अशी लक्षणंही दिसू शकतात.
