Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हार्ट ॲटॅकचा धोका दिसताच सीपीआरसह करा ३ प्रथमोपचार झटपट, डॉक्टरांचा सल्ला - घाबरून न जाता..

हार्ट ॲटॅकचा धोका दिसताच सीपीआरसह करा ३ प्रथमोपचार झटपट, डॉक्टरांचा सल्ला - घाबरून न जाता..

heart attack, perform 3 first aid measures including CPR immediately, doctor's advice - don't panic : हार्ट ॲटॅक येत असताना कोणते प्रथमोपचार करतात ते शिकून घ्या. वेळेप्रसंगी सावध राहाणे नक्कीच गरजेचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2025 14:18 IST2025-07-13T13:58:15+5:302025-07-13T14:18:04+5:30

heart attack, perform 3 first aid measures including CPR immediately, doctor's advice - don't panic : हार्ट ॲटॅक येत असताना कोणते प्रथमोपचार करतात ते शिकून घ्या. वेळेप्रसंगी सावध राहाणे नक्कीच गरजेचे.

heart attack, perform 3 first aid measures including CPR immediately, doctor's advice - don't panic.. | हार्ट ॲटॅकचा धोका दिसताच सीपीआरसह करा ३ प्रथमोपचार झटपट, डॉक्टरांचा सल्ला - घाबरून न जाता..

हार्ट ॲटॅकचा धोका दिसताच सीपीआरसह करा ३ प्रथमोपचार झटपट, डॉक्टरांचा सल्ला - घाबरून न जाता..

हार्ट ॲटॅक म्हणजेच हृदय विकाराचा झटका येणे ही सध्या फार सामान्य समस्या होत चालली आहे. कोणाला तरी हार्ट ॲटॅकआल्याची बातमी सतत कानावर पडत असते. फक्त वृद्धच नाही तर तरुणांनाही हृदय विकाराचा झटका येतो.  (heart attack, perform 3 first aid measures including CPR immediately, doctor's advice - don't panic..)तरुण वयात  असा त्रास होण्याची संख्या वाढत चालली आहे. ताणतणाव तसेच बदललेली जीवनशैली आहार आणि आरोग्य या मुद्यांचा विचार केल्यावर असे लक्षात येईल की आत्ताची जीवनशैली शरीरासाठी पूरक नाही तर मारक ठरते. त्यामुळे शैली बदलणे फार गरजेचे आहे.  

कोणताही आजार किंवा काहीही होत असले तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आजूबाजूला सुजाण लोकं असणे. हृदयविकाराचा झटका कधीही कुठेही येऊ शकतो. आपण त्याची लक्षणे जाणून घेतो, तपासणीही करतो मात्र खरंच तसे काही झाल्यावर करायचे प्रथमोपचार शिकून घेणे फार महत्त्वाचे आहे. अमुकतमुकसोबतच्या मुलाखतीत डॉ. जगदीश हिरेमठ यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. एखाद्याला हार्ट ॲटॅक येत असेल तर इतरांनी पटकन काय करायला हवे याची माहिती त्यांनी सांगितली. 

१. अशावेळी अनेक जण प्रचंड घाबरुन जातात. मात्र घाबरुन चालत नाही पटकन पाऊले उचलावी लागतात आणि कृती करावी लागते. सगळ्यात आधी दवाखान्यात फोन करुन ॲम्ब्युलन्स बोलवावी. काही जण पाहू थोड्या वेळाने असा अंदाज घेतात तसे न करता तात्काळ गाडी बोलवा. गाडी येईपर्यंत आजारी व्यक्तीला ४५ डिग्री मध्ये बसवायचे. त्याच्या सगळ्या बाजूंना उशा लावा आणि इझी चेअर घरी असल्यास त्यात बसवा. आडवे ठेवायचे नाही आणि पूर्ण उभेही बसवायचे नाही. सीपीआर देण्याचे तंत्र सगळ्यांनी शिकून घ्यायला हवे. अगदी सोपे असते. सगळ्यांना जमू शकते. साधी पद्धत शिकून लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो. 

२.कपडे सैल करायचे. हवा लागेल याची काळजी घ्यायची आणि सगळ्यात आधी त्याला डिसप्रिनची गोळी घ्यायची. सगळेच डॉक्टर सांगतात घरात काही ठराविक औषधे असायलाच हवीत त्यातील एक म्हणजे डिसप्रिन. पाण्यात गोळी घालायची आणि विरघळली की आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचे. शरीरात लवकर मिसळते.   

३. त्या व्यक्तीला जागं ठेवायचे. शरीर गार पडणे आणि डोळे बंद होणे हे लो बीपीचे लक्षण आहे. त्यामुळे घाबरुन न जाता त्या व्यक्तीला डोळे मिटू द्यायचे नाहीत. त्याला बोलतं ठेवायचा प्रयत्न करायचा. त्या व्यक्तीला सतत हळू खोकत राहायला सांगायचे. त्यामुळे बीपी वर-खाली होत राहते. असे खोकायला सांगून फार मोठा प्रथमोपचार करता येतो असे डॉ. जगदीश हिरेमठ सांगतात. प्रथमोपचार करणे नक्कीच आपल्या हातात असते. त्यामुळे या काही गोष्टी लक्षात ठेवा.     

Web Title: heart attack, perform 3 first aid measures including CPR immediately, doctor's advice - don't panic..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.