घाम येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम आवश्यक असतो. मात्र, काही लोकांना इतरांच्या तुलनेत खूपच जास्त घाम येतो. खूप जास्त घाम येण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेत हाइपरहायड्रोसिस' असे म्हणतात. (Health tips, Do you sweat constantly and excessively? does the sweat smell bad? Check out 5 reasons for excessive sweating)ही स्थिती दोन प्रकारांमध्ये विभागली जाते. प्रायमरी (मूलभूत) आणि सेकंडरी (दुय्यम). प्रायमरी हाइपरहायड्रोसिस म्हणजे हात, पाय आणि चेहरा या भागांत अधिक घाम येणे. हे सहसा आनुवांशिक असते आणि सामान्य वैद्यकीय कारणांशिवाय असा घाम येतो. सेकंडरी हाइपरहायड्रोसिस ही एखाद्या वैद्यकीय स्थितीमुळे होते. जसे की थायरॉइडची अति कार्यशीलता (हाइपरथायरॉइडिझम), मधुमेह, ताप, इन्फेक्शन, चिंता(anxiety), इतरही काही कारणे असू शकतात.
वातावरण हे एक कारण आहेच. उन्हाळ्यात घाम येणे सहाजिकच आहे. मात्र असेही अनेक जण असतात ज्यांना पंख्याखाली बसल्यावरही घाम येतो. त्यावेळी मात्र फक्त वातावरण हे कारण नसते तर शरीरातील काही बदल किंवा त्रास कारणीभूत असतात. पाहा नक्की काय कारणं असू शकतात.
ताणतणाव जास्त असेल तर घामाचे प्रमाण जास्त असते. मानसिक अस्वस्थतेमुळे घाम सुटतो. त्यामुळे अतिविचार कामाचा ताण सतत विचार करणे या सवयी सोडल्यानेही घामाचे प्रमाण कमी होईल. आपण जे अन्न खातो त्याचाही परिणाम होतो. अतिप्रमाणात मसालेदार अन्न खाणे शरीरात उष्णता निर्माण करते. त्यामुळेही घाम जास्त येतो. कॅफीनमुळे घामाचे प्रमाण वाढते. दिवसातून दोन-तीन वेळा कॉफी प्यायची सवय असेल तर त्यामुळेही घामाची पातळी वाढते. मद्यपानाचा वापर केल्यावर शरीरात फारच जास्त उष्णता निर्माण होते. कितीही थंडावा असला तरी घाम फुटू शकतो. वजन जास्त असल्यामुळे फार घाम येतो. त्यामुळे वजन कमी केल्यानेही घामाची समस्या कमी करता येते.
एक आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे हार्मोनल बदल. खास म्हणजे महिलांमध्ये या कारणामुळे घाम वाढण्याची शक्यता असते. जीवनशैलीत काही बदल करणे उपयुक्त ठरते. उबदार हवामानात शक्यतो हलके, सुताचे व हवेशीर कपडे घालावेत. दररोज अंघोळ करताना स्वच्छतेसाठी अँण्टी-बॅक्टेरियल साबणाचा वापर केल्यास दुर्गंधी टाळता येते. घाम रोखण्यासाठी बाजारात घाम कमी करणारे प्रॉडक्ट्स उपलब्ध असतात. जे डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरणे फायद्याचे ठरेल.